नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. याचा परिणाम आता वृद्धाश्रमांवरही दिसू लागला आहे. आपल्या घरापासून दूर केलं गेलेल्या वृद्धांना दान करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वृद्धांश्रमाची देखरेख करणे आणि दान करणारे येत नसल्याने वृद्धांची स्थिती बिघडली आहे.
फरीदाबाद येथे एनएच-2 स्थित देवीलाल वृद्धाश्रमाचे संचालक कृष्णलाल बजाज सांगतात की, सलग एक महिन्याच्या लॉकडाऊनमुळे दान कमी झालं आहे. त्यामुळे आमच्याकडे सध्या रेशनची कमतरता झाली आहे. कसंबसं वृद्धाश्रम चालवलं जात आहे. येथे 80 वृद्ध राहतात. त्यांना त्रास होऊ देणार नाही मात्र पैसे येत नसल्यानं संकट वाढलं आहे.
बजाज यांनी सांगितले की काही जणांनी औषधे पाठविली आहेत. मात्र खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यासाठी समाजाला पुढं यावं लागेल आणि निराधारांना मदत करायला हवी. दुसरीकडे कोरोनाचे संकट पाहता वृद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी गुरु विश्राम आश्रमातील निराधारांना गढ मुक्तेश्वर आश्रमात पाठविण्यात आले आहे. येथे साधारण 100 वृद्ध राहतात. आग्र्यातील रामलाल आश्रमात 200 हून अधिक वृद्ध राहतात. या आश्रमाशीसंबंधित समाजसेवक नरेश पारस सांगतात, आश्रमात येऊन मदत करणाऱ्या स्वयंसेवींची संख्या कमी झाली आहे. आता लॉकडाऊनमुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झाल्याने दानदेखील कमी झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनाच संकटाचा सामना करावा लागत आहे. अशावेळी अशा सामाजिक संस्थांकडे लक्ष देण्याची गरज आश्रमचालकांनी व्यक्त केली आहे.
संबंधित -किम जोंग उन यांनी असं काय केलं की Coronavirus पासून वाचला देश
मृत्यूशी झुंज देत आहे भारताचा चॅम्पियन खेळाडू, लॉकडाऊनमुळे थांबले कॅन्सरचे उपचार
संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.