Home /News /entertainment /

डब्बेवाले, उद्योजक आणि कलाकारांचं कोरोनावर नवं गाणं, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

डब्बेवाले, उद्योजक आणि कलाकारांचं कोरोनावर नवं गाणं, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

सर्व समाजदूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डबेवाले, उद्योजक आणि कलाकारांनी मिळून कोरोनावर नवीन गाणं सादर केलं आहे.

    मुंबई, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसनं आज संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सर्वजण या संकटाला धैर्याने तोंड देत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अधिकारी असे अनेक समाजदूत आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत आहेत. या सर्व समाजदूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि घरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी 'लढवय्या.. मी महाराष्ट्राचा..' गाणं सर्व मराठी कलाकारांनी तयार केलं आहे. या संकटकाळात आपण सर्वांनी घरातच राहिले पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. सर्वांनी Social Distancing कटाक्षाने पाळले पाहिजे. नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करुया. असा मेसेज या गाण्यातून देण्यात आला आहे. Lockdown मध्ये कार्तिक आर्यनला रोज खावा लागतोय बहिणीचा मार, शेअर केला Video कल्चर फिल्म्स निर्मित टाईम्स म्युझिक प्रदर्शित 'लढवय्या.. मी महाराष्ट्राचा..' या गाण्याचे गीतकार वलय मुळगुंद असून संगीत रसिक मेटांगळे यांनी दिलं आहे. हे गाणं चिन्मय हुल्याळकर आणि सई गांगण यांनी गायलं आहे. हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि नागरिकांच्या मनात कोरोनाशी लढण्याचा निर्धार अधिक वृद्धिंगत व्हावा, हा हे गाणं निर्माण करण्यामागचा हेतू आहे. या गाण्याचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर आणि संकेत सावंत यांनी केलं आहे. रामायणच्या सीतेला साकारायची आहे निर्भयाच्या आईची भूमिका, कारण वाचून कराल सॅल्यूट ह्या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, डॉ. अमोल कोल्हे, सचिन खेडेकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, भाऊ कदम, अशोक समर्थ , सुशांत शेलार, अनिकेत विश्वासराव, मृणाल कुलकर्णी, तेजश्री प्रधान, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्राजक्ता कोळी, मृणाल ठाकुर, अंजली भागवत, विठ्ठल कामत, कौशिक मराठे या दिग्गज कलाकारांसोबतच रामदास करवंदे (अध्यक्ष, मुंबई डबेवाला), इंद्रनील चितळे यांचाही समावेश आहे. (संपादन : मेघा जेठे) बॉलिवूड स्टार्सची स्टाइल 10 वर्षांपूर्वी होती अशी, PHOTOS पाहून पोट धरुन हसाल
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या