मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास

मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास

 स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

Mumbai Local Train: आता ही गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार नवी सिस्टीम लागू केली आहे. मुंबईत नुकतंच फेक आयडी घेऊन प्रवास करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 30 जून: सर्व सामान्य प्रवाशांसाठी मुंबईच्या लोकलचे (Mumbai Local) दरवाजे अजूनही बंदच आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. पण काही प्रवासी फेक आयकार्ड (Fake ID) वापरुन लोकलमध्ये (Local Train) प्रवास करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे लोकलमध्ये (Mumbai Local Train) अनावश्यक गर्दी होत असल्याचंही दिसून येत आहे. आता ही गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार नवी सिस्टीम लागू केली आहे. मुंबईत नुकतंच फेक आयडी घेऊन प्रवास करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला.

आता लोकलमधली गर्दी टाळण्यासाठी सरकारनं क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार आणि भारतीय रेल्वे हे कार्डचा वापर करुन क्यूआर (QR code) कोडच्या साहाय्यानं प्रवासासाठी पाच-स्तरीय रणनीतीवर काम करत आहेत. या सिस्टीमला युनिव्हर्सल ट्रॅव्हल (Universal Travel Pass)असं नाव देण्यात आलं आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच क्यूआर कोडचा पास दिला जाणार आहे. नवीन सिस्टीममुळे मुंबई पालिकेला निर्बंधाच्या पातळीवर आधारीत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना ट्रॅक करण्यास मदत होईल.

कोणत्याही सरकारी संस्थेचा किंवा आरोग्य सेवेतील कर्मचारी असल्याचा फेक आयकार्ड बनवून काही प्रवाशी लोकलनं प्रवास करत आहेत. दिवसेंदिवस अशा प्रवाशांचा सुळसुळाट झाल्यानं राज्य सरकार आता पुन्हा क्यूआर कोड असलेली यंत्रणा राबवणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड्स देण्यात येतील आणि ते कार्ड असतील तरच रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. या युनिवर्सल आयकार्ड कसं मिळवायचं यासाठी राज्य सरकारकडून खास पोर्टल देखील तयार करण्यात आलं आहे.

हेही वाचा- जन्मदात्या बापाकडूनच तीन मुलांच्या हत्येचा प्रयत्न, आईस्क्रिममधून दिलं विष

क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयडी कार्ड अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिले जातील. कर्मचाऱ्यांकडे हे आयडी कार्ड असेल तरच त्यांना रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. क्यूआर कोड असलेले हे युनिव्हर्सल पास स्मार्टफोन आणि क्युआर रिडर मशिनद्वारे तपासले जातील. त्यामुळे ते पास फेक आहेत का हे ओळखण्यात मदत होईल.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळवण्यासाठी सरकारनं खास वेबसाईट तयार केली आहे. या https://epassmsdma.mahait.org/ वर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पास मिळू शकतो.

सध्याचा रोजच्या प्रवाशांचा आकडा पाहता, मध्य रेल्वेवर तब्बल 18 लाखांच्या आसपास आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल 12 लाखांवर प्रवासी लोकलनं प्रवास करतात. यापैकी जवळपास 50 टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा असूनही फेक आयकार्ड्स आणि विनातिकीट प्रवासी यामुळे लोकलमधील अनावश्यक गर्दी वाढत चालली आहे.

हेही वाचा- राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

कोणत्याही सरकारी संस्थेचा किंवा आरोग्य सेवेतील कर्मचारी असल्याचा फेक आयकार्ड बनवून काही प्रवाशी लोकलनं प्रवास करत आहेत. दिवसेंदिवस अशा प्रवाशांचा सुळसुळाट झाल्यानं राज्य सरकार आता पुन्हा क्यूआर कोड असलेली यंत्रणा राबवणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड्स देण्यात येतील आणि ते कार्ड असतील तरच रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. या युनिवर्सल आयकार्ड कसं मिळवायचं यासाठी राज्य सरकारकडून खास पोर्टल देखील तयार करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Fake, Maharashtra, Metro, Mumbai, Mumbai local, Pune, QR code payment, Running local, Train