Home /News /mumbai /

मानखुर्दमध्ये जन्मदात्या बापानं तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळलं विष, एकाचा मृत्यू

मानखुर्दमध्ये जन्मदात्या बापानं तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळलं विष, एकाचा मृत्यू

Mankhurd Crime News: मुंबईतल्या मानखुर्दमध्ये (Mankhurd) हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापानं आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    मुंबई, 30 जून: मुंबईतल्या मानखुर्दमध्ये (Mankhurd) हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापानं आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. एका बापानं आपल्या पोटच्या तीन मुलांना आईस्क्रिममधून विष (Poison) दिलं आहे. यात एका 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Mumbai Crime) मुलांच्या आईच्या तक्रारीनंतर मानखुर्द पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी बापावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडील सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हेही वाचा- राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून चिडलेला आरोपी वडील मोहम्मद अली यानं आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळलं होतं. या घटनेत 5 वर्षांचा अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. तर 7 वर्षांची अलीना आणि 2 वर्षांचा अरमान मानखुर्दमधील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Death, Father, Mumbai, Murder, Murder news, One child, Poison

    पुढील बातम्या