मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला; लसींचा साठा शून्यावर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला; लसींचा साठा शून्यावर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

Maharashtra Covid Vaccination: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत मोठी माहिती दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 30 जून: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत (Maharashtra Covid vaccination) मोठी माहिती दिली आहे. राज्यातली कोरोना लसीकरणाचं (Covid-19 vaccination) प्रमाण कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. लसीच्या डोसचा तुटवडा (short supply of doses) असल्यानं हे प्रमाण घसरल्याचं आरोग्यमंत्री म्हणालेत. दररोज 10 लाखांहून अधिक लोकांचं रोगप्रतिबंधक लसीकरण करणं ही सरकारची योजना आहे. मात्र केवळ अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं ते म्हणालेत.

पुढे आरोग्यमंत्री म्हणाले कि, लोकसंख्येपैकी 70 टक्के नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरणं व्हावं अशी सरकारची योजना आहे. असं झाल्यास राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल. मंगळवारी लसीकरणाचा वेग मंदावलेला दिसला. मंगळवारी केवळ 3 लाख 80 हजार लोकांना लस देऊ शकलो. गेल्या काही दिवसात हा आकडा सरासरी 7 लाखांच्या आसपास होता. एवढंच काय तर राज्यातील लसीचा साठा शून्यावर आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा

राज्यात मंगळवारी 8 हजार 085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल 231 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

हेही वाचा- 'ठाकरे सरकार प्रत्येक कामासाठी केंद्राची मंजुरी घेते?', हायकोर्टाचा सवाल

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के इतका असून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Maharashtra, Mumbai, Pune, Rajesh tope