मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सरकार आणि कोरोनाचे प्रेमसंबंध आहेत का? मनसे नेत्याचा अजब सवाल

सरकार आणि कोरोनाचे प्रेमसंबंध आहेत का? मनसे नेत्याचा अजब सवाल

'आपलं अपयश लपवण्यासाठी शासन जाणीवपूर्वक लोकांना लॉकडाउनची भीती दाखवत आहे. त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करत आहे'

'आपलं अपयश लपवण्यासाठी शासन जाणीवपूर्वक लोकांना लॉकडाउनची भीती दाखवत आहे. त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करत आहे'

'आपलं अपयश लपवण्यासाठी शासन जाणीवपूर्वक लोकांना लॉकडाउनची भीती दाखवत आहे. त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करत आहे'

मुंबई, 16 मार्च : राज्य सरकार (MVA Goverment) आणि कोरोना (Corona) यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत का? असा  सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केलेला आहे.  तसंच, कोरोना महाराष्ट्राला (Maharashtra) सोडून जात नाही इतर राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे.  याचा अर्थ एकतर कोरोनाचे सरकारवर, किंवा सरकारचं कोरोनावर प्रेम आहे म्हणूनच हे घडत असावं, असा उपरोधिक टोला संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या आजुबाजूला असलेल्या गोवा, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत नाही. मग ती महाराष्ट्रातच का वाढत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय राज्य सरकार जाणीवपूर्वक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढवत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.' शासन कुठलेही कारण नसताना अचानक टेस्टिंग का वाढत आहे. टेस्टिंग वाढलं की, रुग्ण संख्या वाढते हे शासनाला माहिती आहे.'

धक्कादायक वळण, 'ती' पीपीई कीट घातलेली व्यक्ती Sachin Vaze? NIA ला संशय

सध्या महाराष्ट्र सरकारचे जी काही प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यावर जनतेमध्ये आक्रोश निर्माण होऊ नये यासाठी शासन जाणीवपूर्वक आकडेवारी वाढ होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय 'सर्व नियम सर्वसामान्यांसाठी कठोरपण राबवले जातात. इतर वेळी मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. वरळीमध्ये केले जाणारे शुटिंग चालते, रात्री पबमध्ये घातलेला धिंगाणा चालतो. मग लग्न समारंभ का चालत नाही?' असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Gold prices today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; चांदीचा दरही घसरला'

आपलं अपयश लपवण्यासाठी शासन जाणीवपूर्वक लोकांना लॉकडाउनची भीती दाखवत आहे. त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करत आहे. जेणेकरून विज बिल भरू न शकणाऱ्या लोकांची वीज तोडता यावी, लोकांकडून परिस्थिती नसताना शाळेच्या फी भरता याव्यात, बळजबरीने मालमत्ता कर वसूल करता यावा आणि लोकांनी त्यावर राग व्यक्त करता येऊ नये. यासाठी हा सगळा प्रकार घडवून येत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

First published:

Tags: MNS, Sandeep deshpande, Shivsena, मनसे, संदीप देशपांडे