मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold prices today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

Gold prices today: आतापर्यंत 11000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

गेल्या वर्षातील रेकॉर्ड स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 11000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी जवळपास 11 हजार रुपये स्वस्त झाली आहे.

गेल्या वर्षातील रेकॉर्ड स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 11000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी जवळपास 11 हजार रुपये स्वस्त झाली आहे.

गेल्या वर्षातील रेकॉर्ड स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 11000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी जवळपास 11 हजार रुपये स्वस्त झाली आहे.

नवी दिल्ली, 16 मार्च : जागतिक बाजारात कमकुवत निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) व्यापाराला सुरुवात झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं (Gold Price Today) 44,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर (Silver Price Today) चांदी 0.2 टक्क्यांनी घसरुन 67,510 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवसाय करत आहे. गेल्या सत्रात सोन्याचे दर 0.35 टक्के आणि चांदी 1.3 टक्क्यांनी वधारली होती.

गेल्या वर्षातील रेकॉर्ड स्तरावरुन आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 11000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी जवळपास 11 हजार रुपये स्वस्त झाली आहे. सोन्याचे भाव गेल्या 11 महिन्यातील सर्वात कमी स्तरावर आले आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याचा दर 56,200 इतक्या उच्चांकी स्तरावर होता. तर या वर्षात सोनं जवळपास 6 हजार रुपयांनी घसरलं आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव -

आज राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,160 रुपये आहे.

चेन्नईत 46,120

मुंबईत 44,830

तर, कोलकातामध्ये सोन्याचा दर 46,940 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

(वाचा - केवळ 50 हजार रुपयांत करा कोरफडीची लागवड, वर्षभरात होईल 10 लाख रुपये कमाई)

आंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकेत सोन्याचा दर आज 1,732.32 डॉलर प्रति औंस इतका आहे. तर चांदी 0.04 डॉलरच्या घसरणीसह 26.20 डॉलर स्तरावर आहे.

भारतात येणाऱ्या काळात लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे सोन्या-चांदीचीही मोठी खरेदी होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या घसरलेल्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसंच 2021 मध्ये सोन्याचा भाव वाढणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या वर्षात सोने दर 63000 पर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money, Silver prices today