मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /धक्कादायक वळण, 'ती' पीपीई कीट घातलेली व्यक्ती Sachin Vaze? NIA ला संशय

धक्कादायक वळण, 'ती' पीपीई कीट घातलेली व्यक्ती Sachin Vaze? NIA ला संशय

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या टीमच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहे

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या टीमच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहे

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या टीमच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहे

मुंबई, 16 मार्च : मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर (Mumbai Carmichael Road) हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी सापडलेल्या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्या दिवशी स्फोटकं ठेवण्यात आली होती त्याच रात्री पीपीई कीट (PPE kit) घातलेली एक व्यक्ती कार मायकल रोडवरुन फेरफटका मारत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही व्यक्ती सचिन वाझे (Sachin Vaze) असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थना NIA ला आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या टीमच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले आहे. आता घटनास्थळाचा एक व्हिडीओ हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पीपीई कीट घालून फिरत आहे.  NIA ला संशय आहे की पीपीई कीट घातलेल्या या व्यक्तीचा स्फोटकांनी भरलेली कारशी संबंध असावा त्यामुळे आता ही पीपीई कीट घातलेली व्यक्ती व्यक्ती कोण आहे? याचा शोध NIA घेत आहे.

मोठी बातमी, मुंबईला मिळणार नवे पोलीस आयुक्त, कुणाची लागणार वर्णी?

तर दुसरीकडे ही व्यक्ती सचिन वाझे असावेत असा संशय NIA ला आहे. त्यामुळे या घटनेचा तपास करण्याकरता सचिन वाझे यांना त्याच माइकल रोडवर. त्याच ठिकाणी त्याच वेळेत. तशाच पद्धतीने पीपीई कीट घालून चालण्यास सांगणार आहेत. जेणेकरून सचिन वाझे यांची चालण्याची पद्धत आणि पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत एकच आहे का? हे NIA ला तपासायचे आहे.

त्यामुळे NIA चा जो संशय आहे की, 25 फेब्रुवारीच्या रात्री सचिन वाझे हे कार मायकल रोडवर होते? या प्रश्नाचे उत्तर या सीसीटीव्ही फुटेजमुळे NIA ला मिळणार आहे.

सचिन वाझेंच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज गायब

दरम्यान,  सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत काॅम्पलेक्स (Saket Complex Thane) इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) डीव्हीआर सहित घेवून गेले होते आणि धक्कादायक म्हणजे, सचिन वाझे यांची CIU ची टीमच हे सीसीटीव्ही फुटेज घेवून गेली होती. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, हे सीसीटीव्ही फुटेज तेही सचिन वाझे हे राहत असलेल्या इमारतीचेच फुटेज CIU चे अधिकारी यांनी का नेले असेल?

शिवसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भाजपच्या गडाला भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात!

सचिन वाझे हे ठाणे येथील साकेत काॅम्पलेक्समध्ये राहतात. 27 फेब्रुवारीच्या दिवशी साकेत काॅम्पलेक्स येथे CIU टीमचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, साहय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलीस नाईक युवराज शैलार आणि पोलीस काॅन्स्टेबल शिवाजी देसले हे पोहचले. सुरुवातीला त्यांनी तपासाकामी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितले पण 'लेखी दिल्याशिवाय असं आम्ही काहीच करू शकत नाही', असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर या चौघांनी एका कागदावर लिहून ते सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं त्यात त्यांनी पुढील प्रमाणे मजकूर लिहिला होता. “सेक्शन 41 CRPC कलमानुसार, आम्ही साकेत सोसायटीला ही नोटीस देतोय की, मुंबई क्राईम ब्रांच CIU DCB CID MUMBAI यांनी रजिस्टर केलेल्या क्राइम रजिस्टर 40/21 गुन्ह्यानुसार, कलम 286, 465, 473, IPC 120 (B), INDIAN EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यांत तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे आहे. त्यानुसार, आपल्या इमारतीतील 2 DVR हे आम्हास घेवून जायचे आहेत. या नोटीसीनुसार आम्ही आपल्या सीसीटीव्ही फुटेज द्यायचे आदेश देतोय” खाली CIU DCB CID युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर सीसीटीव्ही फुटेज जप्त करुन घेवून गेले.

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं महागणार; 1 एप्रिलपासून खिशावर होऊ शकतो परिणाम

आता प्रश्न हा उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्याच घरचे सीसीटीव्ही फुटेज या CIU टीमने का जप्त केले आणि तेही कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे जप्त केले आणि पुढे या फुटेजचे काय केले? हा सर्व प्रकार सचिन वाझे यांच्यासह त्यांचे वरीष्ठ पोलीस उपायुक्त तसंच पोलिस सहआयुक्त यांना माहिती होता का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

First published:
top videos

    Tags: Cctv footage, Maharashtra, Mumbai, Nia, Police commissioner, Sachin vaze