मुंबई 15 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघा़डी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केलं. याकाळात बंडखोर आमदारांचं मन दुसरीकडे वळू नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं (Dinner Diplomacy of Shinde Fadnavis) आयोजन केलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून उद्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे.
दोन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्रित डिनरसाठी बोलावलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिंदे सरकारचं मोठं पाऊल; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती
16 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने वांद्रे येथील ताज लँड या हॉटेलमध्ये सेना-भाजप आमदारांना संध्याकाळी सात वाजता स्नेह भोजनाचे निमंत्रण आहे. तर 17 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सेना-भाजप आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. हॉटेल ट्रायडेंट येथे हे स्नेहभोजन होईल. त्याच दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आमदारांना मतदान करण्याचं मार्गदर्शन केलं जाईल. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत आमदारांना मुंबईतच थांबावं लागणार आहे. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde