जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / फडणवीसांचा आणखी एक दणका, अशोक चव्हाणांवर सुद्धा आणणार हक्कभंग

फडणवीसांचा आणखी एक दणका, अशोक चव्हाणांवर सुद्धा आणणार हक्कभंग

फडणवीसांचा आणखी एक दणका, अशोक चव्हाणांवर सुद्धा आणणार हक्कभंग

‘सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षण (maratha reservation) संदर्भात खोटे निवेदन केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमकपणे बाजू मांडत महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) चांगलेच धारेवर धरले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात विशेष हक्कभंग सादर केल्यानंतर आता काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याविरोधात सुद्धा हक्कभंग आणणार अशी घोषणा केली आहे. ‘सभागृहात अशोक चव्हाण यांनी  आज मराठा आरक्षण (Maratha reservation) संदर्भात खोटे निवेदन केले. 102 ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे’, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. उत्तराखंडमध्ये गुजरात पॅटर्न! RSS च्या माजी प्रचारकाची मुख्यमंत्री पदासाठी निवड ‘मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना अॅटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. अॅटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात केलेला कायदा कसा निरस्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असंही फडणवीस म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. अन्वय नाईक प्रकरण मी दाबले असं खोटे विधान केले. याप्रकरणी मी हक्कभंग दाखल केला आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. सचिन वाझे शिवसेनेत होते, तिथं प्रवक्ते होते. कोर्टाचा निर्णय डावलून त्यांना वेगवेगळी कामे करण्यासाठी सेवेत घेतले गेले, असा आरोपीही फडणवीस यांनी केला. टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा होणार समावेश! ‘मोहन डेलकर प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पण प्रशासक म्हणून केलेल्या कामाबद्दल गुन्हा दाखल होत नाही’ असंही फडणवीस म्हणाले. मुंबईत जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यावेळी एका इनोव्हा गाडीचा वापर करण्यात आला होता. ही गाडी मंगळवारी सायंकाळपर्यंत इनोव्हा गाडी मुंबईतच होती. ज्याला तपास प्रक्रिया माहिती होती, त्यांनी प्लॅनिंगनुसार हत्या केली आहे. नि:पक्ष चौकशी झाल्यास सरकारमधील मोठी नावे समोर येतील, त्यामुळं अशी चौकशी ते करणार नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला. गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग ‘अन्वय नाईक यांच्या केसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबली असं वक्तव्य देशमुख यांनी केलं आणि त्याची दुरुक्ती केली. त्यांची आत्महत्या झाली आहे. असं स्टेटमेंट त्यांच्या पत्नी आणि मुलीने दिलं आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने याबद्दलचे स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले आहेत. हे प्रकरण दाबले असं म्हणणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे. माझा आणि सुप्रीम कोर्टाचा देशमुख यांनी अवमान केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. आलिया भट्टचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, रणबीरसाठी लिहिला खास मेसेज तसंच, सुप्रीम कोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना माहिती असूनही त्यांनी सभागृहाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार आहे त्यापासून माझा हक्क दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विशेष हक्कभंग समितीकडे हे प्रकरणे देण्यात यावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात