आलिया भट्टचा कोरोना अहवाल आला Negative, रणबीरसाठी लिहिला खास मेसेज

आलिया भट्टचा कोरोना अहवाल आला Negative, रणबीरसाठी लिहिला खास मेसेज

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या सेटवर संजय लिला भन्साळी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली जात आहे. यात आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह (Alia Bhatt Tests Corona Negative) आला आहे.

  • Share this:

मुंबई 10 मार्च : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Report Positive) आला आहे. यानंतर अभिनेत्री आलिया भट्टनंही स्वतःला विलगीकरणात ठेवलं होतं. अशात आता आलियाच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या सेटवर संजय लिला भन्साळी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली जात आहे. यात आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह (Alia Bhatt Tests Corona Negative) आला आहे. तसंच संजय लिला भन्साळी यांच्या आईचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

इंडियन एक्सप्रेसननं दिलेल्या वृत्तानुसार, गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathaiwadi) सिनेमातील काही जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह आले असून ते सध्या क्वारंटाईन आहेत. संजय आणि रणबीर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच आलियानंही स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. यानंतर संजय यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली गेली.

संजय लिला भन्साळी यांची आईदेखील ठीक आहे. त्यांनी सांगितलं, की संजय यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वात आधी त्यांच्या आईची चाचणी करण्यात आली. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, खबरदारी म्हणून त्यादेखील क्वारंटाईन झाल्या आहेत. तर, दुसरीकडे रणबीरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आलियानं त्याच्यासाठी एक खास मेसेज शेअर केला आहे. आपण ज्या गोष्टींचा सामना करतो, त्यातूनच आपण पुढे जात असतो, असं आलियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नीतू कपूर यांनी मंगळवारी एक पोस्ट शेअर करत आलियाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली होती. सोबतच काळजी आणि प्रार्थनांसाठी त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले होते. रणबीरवर सध्या औषधोपचार सुरू असून सध्या त्याची तब्येत ठीक आहे. सध्या रणबीर होम क्वारंटाईनमध्ये असून योग्य प्रकारे स्वतःची काळजी घेत आहे, असंही च्यांनी सांगितलं होतं. सोबतच रणबीरचा एक फोटोही शेअर केला होता.

Published by: Kiran Pharate
First published: March 10, 2021, 12:05 PM IST

ताज्या बातम्या