Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा होणार समावेश!

IND vs ENG : टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी, मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा होणार समावेश!

भारत विरुद्ध इंग्लंड याांच्यातील पाच टी20 मॅचची मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. या मालिकेच्या तोंडावर टीम इंडियाला (Team India) दोन धक्के बसले आहेत.

    अहमदाबाद, 10 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड याांच्यातील पाच टी20 मॅचची मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. या मालिकेच्या तोंडावर टीम इंडियाला (Team India) दोन धक्के बसले आहेत. मिस्ट्री स्पिन वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला आहे. (Varun Chakravarthy fails fitness test again) त्यामुळे आता तो या मालिकेतून आऊट झालाआहे. त्याचबरोबर यॉर्कर एक्सपर्ट टी. नटराजन (T. Natarajan) देखील जखमी झाला आहे. नटराजन सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये  आहे. नटराजनवर सध्या ट्रेनिंग घेत असून तो सुरुवातीच्या काही मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा सदस्य असलेल्या चक्रवर्तीने मागील आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) चांगली कामगिरी केली होती.  या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. त्यावेळी  तो दुखापतीमुळे टीमच्या बाहेर गेला होता. या दुखापतीनंतर तो बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेत होता. ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र आता या मालिकेतूनही तो खराब फिटनेसमुळे बाहेर पडला आहे. (हे वाचा-VIDEO: मैदानात कुणालाही न घाबरणारा सचिन कोरोना टेस्टच्या दरम्यान ओरडतो तेव्हा...) मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला संधी मीडियातील रिपोर्टनुसार इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) याचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. राहुलकडे या मालिकेपूर्वी निवड समितीने दुर्लक्ष केले होते. आता वरुण चक्रवर्ती जखमी झाल्याने राहुलला संधी मिळू शकते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत राहुल चहरची स्टँडबाय म्हणून  निवड करण्यात आली होती. (हे वाचा- संजना गणेशनचे प्रश्न, बुमराहची उत्तरं, VIRAL होतोय हा VIDEO ) भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील संपूर्ण टी-20 मालिका ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) वर खेळवली जाणार आहे. पहिली टी20 - 12 मार्च दुसरी टी20 - 14 मार्च तिसरी टी20 - 16 मार्च चौथी टी20 - 18 मार्च पाचवी टी20 - 20 मार्च
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, India vs england, KKR, Shocking news, Sports

    पुढील बातम्या