नवी दिल्ली, 10 मार्च : उत्तराखंड राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची (New Uttarakhand Chief Minster) घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रचारक आणि वरिष्ठ भाजप नेते तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांची पक्षानं मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी धन सिंह रावत, सतपाल महाराज, अजय भट्ट आणि केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक या नावांची चर्चा होती. मात्र आमदारांच्या बैठकीमध्ये तिरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संघाचे प्रचारक होते.
कोण आहेत तिरथ सिंह रावत ?
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस , माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तराखंडचे माजी शिक्षणमंत्री अशा जबाबदाऱ्या रावत यांनी सांभाळल्या आहेत. ते 1983 ते 1988 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
Tirath Singh Rawat elected as Uttarakhand BJP legislature party leader, to take oath as CM today.
Read @ANI Story | https://t.co/Gdc8OGKfz8 pic.twitter.com/eLXtX21K6z
— ANI Digital (@ani_digital) March 10, 2021
(हे वाचा : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा? वाचा महत्त्वाची कारणं )
रावत हे 1997 साली पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. उत्तराखंड राज्याची 2000 साली निर्मिती झाल्यानंतर ते राज्याचे पहिले शिक्षण मंत्री बनले. (First Education Minster of Uttarakhand) भाजपाने 2007 साली त्यांची प्रदेश महामंत्री म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकारी तसेच प्रदेश सदस्यता प्रमुख देखील होते. रावत यांची 2013 साली उत्तराखंड प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. तर 2017 साली ते राष्ट्रीय सरचिटणीस बनले.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचादरम्यान अखेर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी राजीनामा (Uttarakhand Chief Minister resignation) दिला आहे. भाजपमधील अनेक मोठ्या नेत्यांचं समर्थन असतानाही रावत यांना आपली खुर्ची सोडावी लागली आहे. त्यांच्या राजीनाम्याचं सर्वात महत्त्वाचं कारण पक्षातील आमदार आणि नेत्यांच्या एका वर्गात असणारी नाराजी सांगितली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chief minister, India, New cm, Tirath singh rawat, राज CM