आम्हाला उद्धव ठाकरेंचा प्रचंड आदर आहे, आमच्याकडे त्यांच्या आरोपाची उत्तरं नाहीत असं नाही, पण आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. कारण हे भावनिक बंधन आहे, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं
मुंबई 02 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावतीने एक पत्र शिंदेंना पाठवण्यात आलं. पत्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा हा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह आहे. शिवसेनेने अशी कृती करायला नको होती. सेनेचा तो निर्णय चुकीचा आहे. सेनेच्या या नोटीशीवर रीतसर उत्तर देऊ. याविरोधात न्यायालयात जाणार आहोत, असं दीपक केसरकर म्हणाले. यासोबतच आम्ही आजही शिवसैनिक आहोत. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.
'फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला जड जातंय; पण त्यांचं कौतुक वाटतं की...', नव्या सरकारबाबत काय म्हणाले राऊत?
पक्षात प्रतिज्ञापत्र नाही प्रेमाचं बंधन हवं. आम्हाला उद्धव ठाकरेंचा प्रचंड आदर आहे, आमच्याकडे त्यांच्या आरोपाची उत्तरं नाहीत असं नाही, पण आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. कारण हे भावनिक बंधन आहे, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. आमचा पुढचा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. आमची लढाई कर्तव्याची आहे. आम्ही उद्धव साहेबांना विरोध किंवा प्रतिउत्तर देणार नाही. आज शिवसैनिकापेक्षा राष्ट्रवादी आणि क्राँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना जवळचे वाटतात, असंही केसरकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.