Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा

एकनाथ शिंदे आता शिवसेनेचे नेते नाही, उद्धव ठाकरेंचं पत्र खरं, संजय राऊतांनी केला खुलासा

'उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले ही लोक आहे, ते असं करत आहे. त्यांनी लोकांना भ्रमिष्ठ करू नये.

'उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले ही लोक आहे, ते असं करत आहे. त्यांनी लोकांना भ्रमिष्ठ करू नये.

'उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले ही लोक आहे, ते असं करत आहे. त्यांनी लोकांना भ्रमिष्ठ करू नये.

    मुंबई, 02 जुलै : 'एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर पक्षाची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सहीने ही कारवाई झाली आहे. आता ते शिवसेनेचे नेते नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारानुसार कारवाई केली आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी त्या पत्राबद्दल स्पष्ट खुलासा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीची चौकशी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याच्या पत्राबद्दलही खुलासा केला आहे. 'आपला अंतआत्मा सांगत असतो, की तू काही केलं नाहीतर घाबरायचं कशाला. म्हणून मी ईडीच्या कार्यालयात गेलो. मलाही मार्ग होता, गुवाहाटीला जाण्याचा पण आम्ही गेलो नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणारे माणसं आहोत. स्वाभिमान नावाची गोष्ट असते. पण, अशा पद्धतीने वागण्याचे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, मला जे विचारलं त्याची मी उत्तरं दिली. माझा या विषयाशी कोणताही संबंध नाही. बाहेर आरोप झाले आणि मला चौकशीला बोलावलं, असं राऊत ईडीच्या चौकशीवर बोलले 'उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. असं जर कुणी म्हणत असेल तर हे त्यांनी आधी स्वत: ला विचारलं पाहिजे. शिवसेनेतून बाहेर पडलेले ही लोक आहे, ते असं करत आहे. त्यांनी लोकांना भ्रमिष्ठ करू नये. नवे सरकार आले आहे, त्यांनी काम करावे. मुंबईही महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. मुंबईतून शिवसेना संपवण्यासाठी भाजपची ही खेळी आहे. हे आता हळूहळू दिसत आहे' अशी टीकाही राऊत यांनी केली. 'आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाही. शुक्रवारी आमची एक बैठक झाली. मी त्या बैठकीला नव्हते. मी भाजपच्या एका शाखेला गेलो होतो. माझी पक्षप्रमुखांशी चर्चा झाली. आमदार आणि खासदारांची भावना जाणून घेतली. आमदार आणि खासदार घडवून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. हा जो पक्षाचा कार्यकर्त्या हा होणत्याही दबावाला बळी पडणार नाही. उद्या मलाही पाडण्याचाही प्रयत्न झाला. मी पडलो असतो तरी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. जे बुडबुडे होते ते फुटले आहे, असंही राऊत म्हणाले. काँग्रेस वेळा खूप फुटली, प्रत्येक जण म्हणतो आम्ही गांधींच्या विचारांचे आहोत. पण मुळ काँग्रेस कोणती आहे इंदिराजींची आहे. राज्यात काँग्रेसचे चार पक्ष आहे. असं काही बोलण्यात अर्थ नाही जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे, असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. माझ्या तोंडात उपमुख्यमंत्री हा शब्द येत नाही. त्यांना नेहमी भावी मुख्यमंत्री म्हणत आलोय. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री म्हणणे मला जड जात आहे. पोस्टरवरून अमित शहा यांचा फोटो काढला हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत मुद्दा आहे. त्यांचे पंख छाटले असं मी म्हणणार नाही. नवे सरकार स्थापन होत आहे, गटनेतेपदाची चर्चा होत आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. पण, पक्षाचा आदेश याचं पालन करत ते वागले याबद्दल कौतुक केलं पाहिजे, असं चिमटा संजय राऊत यांनी फडणवीस यांना काढला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या