मुंबई, 11 एप्रिल : लॉकडाउनमुळे सगळे उद्योग आता घरून करायला लागत आहेत. शेतीविषयक कामं सोडल्यास बाकी घराबाहेर पडून करायचे सगळे उद्योग-धंदे बंद आहेत. मच्छीमारांनासुद्धा आता घरी थांबावं लागत असल्यानं त्यांचं रोजचं काम थांबलं आहे. पण मुंबईतल्या एका कुटुंबाचा work from home चा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरळीच्या एका मच्छिमार कुटुंबाचं घरून कसं काम सुरू आहे याचा हा व्हिडीओ आहे. कोळी बांधवांंचं समुद्र हेच खरं घर. आता कोळीवाड्यात राहणाऱ्या या कुटुंबाचा समुद्राजवळ घर असण्याचा फायदा करून घेत चक्क खिडकीतूनच गळ टाकला आहे. लॉकडाऊनमध्ये घरातूनही यांचं काम छान सुरू असल्याचं दिसतं. हा व्हिडीओ वरळी कोळीवाड्याचा असल्याचं सांगितलं जातं. वरळी कोळावाड्याचा परिसर मुंबईतला रेड झोन जाहीर झाला आहे. हा मुंबईतला सगळ्यात मोठा हॉट स्पॉट ठरत आहे. वाचा - पोटच्या गोळ्याचा जीव वाचवण्यासाठी आईची धावाधाव, अखेर कुशीतच घेतला शेवटचा श्वास प्रभादेवी आणि वरळी कोळीवाडा इथे कोरोनाव्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे सील आहे. म्हणूनच कदाचित कोळी बांधवांना अशा खटपटी करून आपलं काम सुरू ठेवावं लागत आहे.
दरम्यान मुंबईत शनिवारीसुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा चढाच राहिला. दिवसभरात 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. दिवसभरात मुंबईत 189 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले, अशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची माहिती आहे. अन्य बातम्या अॅम्ब्युलन्स मिळेना, नवजात अर्भकाला घेऊन दुचाकीवरून डॉक्टरने गाठलं रुग्णालय कोरोनालढ्यात मुंबईच्या IIT ने केली कमाल; जवळ न जाता रुग्णांची तपासणी करण्यासाठी कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात

)







