जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात

कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात

कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी लक्षात घेऊन सरकारनं मृतदेह दफन करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदोर, 11 एप्रिल : मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. इंदोर आणि भोपाळमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी लक्षात घेऊन सरकारनं मृतदेह दफन करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. मृत्यूचं प्रमाण वाढत असल्यानं मृतदेह दफन करण्यासाठी लोकांना थांबून राहावं लागत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी सरकारनं आधीच जादा खोदकाम सुरू केलं आहे. स्थानिक लोकांच्या मागणीनंतर प्रशासनानं 10 मृतदेह राहातील एवढ्या कबरी आधीच खोदून ठेवल्या आहेत आणखी खोदकाम सुरू आहे. इंदूरमधील चंदननगर इथल्या स्मशानभूमीत मागच्या 20 दिवसांपासून जवळपास 45 मृतदेह दफन कऱण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात हॉटस्पॉट म्हणून इंदोरचा उल्लेख केला जातो. राज्यातील या शहरात कोरोनाग्रस्त रुणांची संख्या सर्वाधिक आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही याच शहरात जास्त आहे. हे मृत्यूचं प्रमाणा आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाकडून आधीच दफनविधीची तयार करण्यात येत आहे. वाढत्या मृत्यूदराचा धोका लक्षात घेऊन स्मशानभूमीची जागा कमी पडेल अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. वाचा- महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा मृतदेहाचं दफन करण्यासाठी साधारण 6 फूट खोल खोदलं जातं मात्र कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांसाठी याची खोली वाढवून 10 फूट करण्यात आली आहे. कबर खोदण्यासाठी एवढी माणसं आणि वेळ सध्या शक्य नसल्यामुळे पोकलँड मशीनद्वारे खोदकाम सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी खोदकाम केलं जात आहे. वाचा  - जगभरात वेगवेगळ्या रुपात थैमान घालतोय corona, संशोधनात व्हायरसची 3 रूपं आली समोर मिळालेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 13 मृतदेह दफन करण्यात आले आज पुन्हा पोकलँड मशीनच्या मदतीनं खोदकाम केलं जात आहे. गुरुवारी 8, शुक्रवारी 3, शनिवारी 2 मृतदेह दफन करण्यात आले होते. 24 तासांत एका डॉक्टरसह 7 जणांचा कोरोनानं घेतला बळी इंदोमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. मागच्या 24 तासांत एकट्या इंदोरमध्ये डॉक्टरसह 7 जणांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इंदोरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30 वर पोहोचला आहे. तर मध्य प्रदेशात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण इंदोरमधील आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 470 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 249 केसेस या इंदोरमधल्या आहेत. तर भोपाळमध्ये मागच्या 24 तासांत नवीन 21 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अन्य बातम्या मुस्लिम तरुणांकडून हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार; खांदा देऊन घडवलं ऐक्याचं दर्शन लष्करात असलेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा 2 हजार किमी प्रवास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात