जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO : पोटच्या गोळ्याचा जीव वाचवण्यासाठी आईची धावाधाव, अखेर त्यानं कुशीतच घेतला शेवटचा श्वास

VIDEO : पोटच्या गोळ्याचा जीव वाचवण्यासाठी आईची धावाधाव, अखेर त्यानं कुशीतच घेतला शेवटचा श्वास

VIDEO : पोटच्या गोळ्याचा जीव वाचवण्यासाठी आईची धावाधाव, अखेर त्यानं कुशीतच घेतला शेवटचा श्वास

लॉकडाऊनमध्ये गाडी मिळत नव्हती त्यामुळे आई चिमुकल्याला कुशीत घेऊन धावत हॉस्पिटलला चालली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

बिहार, 11 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता एका चिमुकल्याला रुग्णालयात नेण्यासाठी गाडी न मिळाल्यानं प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णवाहिकेची वाट पाहाता पाहाता चिमुकल्यानं आईच्या कुशीत 3 वर्षांच्या चिमुकल्यानं जीव सोडला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बिहारच्या जहानाबाद इथे घडली आहे. हा चिमुकला गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होता. लॉकडाऊनमध्ये गाडी मिळत नव्हती त्यामुळे आई या चिमुकल्याला कुशीत घेऊन धावत सरकारी रुग्णालयात गेली. चिमुकल्याची तब्येत जास्तच खालवल्यानं डॉक्टरांनी पटना इथल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पटणा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर वाहनसुद्धा मिळत नव्हतं. पोटच्या पोराचा जीव वाचवण्यासाठी आईच्या जीवाची घालमेल सुरू झाली. जहानाबादपासून पटना 50 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी ही आई दोन तास इकडे तिकडे भटकत होती. मात्र कुठेच सोय होत नाही हे लक्षात आल्यानंतर तिनं चिमुकल्याला उचललं आणि खांद्यावर घेऊन पटनाला जाणारी वाट धरली. मात्र आईच्या कुशीतच चिमुकल्यानं शेवटचा श्वास घेतला.

जाहिरात

बिहारच्या अरवल जिल्ह्यातील साहोपूर गावातील 3 वर्षांच्या चिमुकल्याची तब्येत बिघडली. तेव्हा त्याच्या आईने मुलाला आधी जवळच्या आरोग्य केंद्रात आणलं. तिथल्या डॉक्टरांनी जहानाबाद इथं जाण्याचा सल्ला दिला. लॉकडाऊन असल्यानं खूप शोध घेतल्यानंतर रिक्षा मिळाली. मुलाला जहानाबाद इथं आणलं पण तिथून पटना नेण्यास सांगण्यात आलं. पण पटनाला जाण्यासाठी कोणतंच वाहन उपलब्ध नव्हतं. रुग्णवाहिका तरी मिळेल यासाठी आई धडपड सुरू होती. हे वाचा : कोरोनाचा कहर! भारतातल्या या शहरात मृत्यूआधीच कबरींसाठी खोदकामाला सुरुवात जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय असूनही आपत्कालीन परिस्थितीत हे रुग्णालय रुग्णवाहिका पुरवू शकले नाही. चिमुकला आईच्या कुशीत वेदनेनं विव्हळत होता. वडील रुग्णवाहिकेसाठी इकडे तिकडे भटकत होते. या सगळ्या धावपळीत मुलाची प्रकृती खालवली आणि त्यातच मुलाचा मृत्यू झाला. हे वाचा : एप्रिलमध्ये वाढला कोरोनाचा वेग, वाचा गेल्या 15 दिवसातली धक्कादायक आकडेवारी संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात