कोरोनालढ्यात मुंबईच्या IIT ने केली कमाल; जवळ न जाता रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्मार्ट स्टेथेस्कोप

कोरोनालढ्यात मुंबईच्या IIT ने केली कमाल; जवळ न जाता रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्मार्ट स्टेथेस्कोप

भारतातील वेगवेगळ्या रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात असे 1000 डिजीटल स्टेथोस्कोप (Digital Stethoscope) पाठवण्यात आलेत.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : कोरोनाव्हायरसची (CoronaVirus) लागण झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, नर्स दिवसरात्र झटत आहेत. ज्या रुग्णांपासून आपण सर्व जण दूर राहत आहोत, मात्र डॉक्टरांना या रुग्णांच्या जवळ राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर किती तरी वेळा त्यांच्या संपर्कात येतात. त्यातील एक तपासणी म्हणजे स्टेथोस्कोपने (stethoscope) तपासणी.

कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना श्वसनसंबंधी समस्या असतात. त्यामुळे त्यांचे हृदयाचे ठोके आणि छातीतील आवाज ऐकण्यासाठी ते आतापर्यंत जो स्टेथोस्कोप वापरला जातो तो वापरत आहेत. त्यासाठी त्यांंना रुग्णाच्या जवळ जावं लागतं आणि त्यांनाही कोरोनाव्हायरसचा धोका बळावतो.

हाच धोका कमी करण्यासाठी आयआयटी मुंबईने (IIT-Bombay) असं डिजीटल स्टेथोस्कोप तयार केलं आहे, ज्यामुळे रुग्णापासून लांब राहूनदेखील त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील आणि ते रेकॉर्डही करता येतील.

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, हल्लेखोरांमध्ये एक होता पॉझिटिव्ह

हा स्टेथोस्कोप तयार करणा-या टिमच्या एका सदस्याने सांगितल्यानुसार, रुग्णाच्या हृदयाच्या गतीबाबतचा डाटा ब्लूटूथच्या मदतीने डॉक्टरांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी रुग्णाजवळ जाण्याची गरज नाही.

टीमचे सदस्य आदर्श के. यांनी सांगितलं, यामध्ये कानात लावले जाणारे 2 उपकरण एका ट्युबला जोडण्यात आलेत. ही ट्युब आजार ओळखण्यात अडचण ठरणा-या आवाजांना हटवून फक्त शरीरातील आवाज पाठवतं.

दुसरं म्हणजे हा स्टेथोस्कोप विविध आवाजांना वाढवून आणि फिल्टर करून त्यांना इलेक्ट्रॉनिक संकेतांमध्ये बदलण्यासाठी सक्षम आहे. हे संकेत स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर फोनोकार्डियोग्रामच्या रुपात दिसतो, असंही आदर्श यांनी सांगितलं. त्यामुळे यामार्फत मिळणारी माहिती इतर डॉक्टरांनाही विश्लेषण आणि पुढील उपचारासाठी पाठवली जाऊ शकते.

Work From Home साठी फायदेशीर ठरेल WhatsApp चं हे फिचर, काय आहे घ्या जाणून

या डिजीटल स्टेथोस्कोपला पेटेंट मिळालं आहे. आयुडिव्हाइस नावाने स्टार्टअप चालवणा-या या टिमने भारतातील वेगवेगळ्या रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात असे 1000 स्टेथोस्कोप पाठवलेत.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 11, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading