क्वारन्टाइन रुग्णांपासून नाही होणार कोरोना, नवी मुंबईचा पॅटर्न मोदी सरकार देशभर राबवणार

क्वारन्टाइन रुग्णांपासून नाही होणार कोरोना, नवी मुंबईचा पॅटर्न मोदी सरकार देशभर राबवणार

नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेलं अॅप चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

‌नवी मुंबई, 16 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव (Coronaviryus) रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. असं असतानाही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र अशा स्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेने (Navi mumbai pattern) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेलं अॅप चर्चेचा विषय ठरत आहे.

‌होम क्वारन्टाइनमध्ये (Home Quarantine) असलेल्या नागरिकांपासून इतरांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोवी गार्ड आणि कोवी केअर अॅप तयार केलं. हाच पॅटर्न आता देशभरातील महापालिकांमध्ये राबवण्यात येणार आहे. या दोन्ही अॅपमुळे नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आलं आहे. यामुळे केंद्राच्या सचिवांनी नवी मुंबई महापालिकेची योजना आता देशपातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोवीगार्डमुळे होम क्वारन्टाइन असलेला नागरिक घराबाहेर पडताच महापालिकेच्या कंट्रोल रूमला माहिती मिळते. तर कोवीकेअरमुळे कोरोना रुग्ण सापडताच 3 किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना एका क्लीकवर अलर्ट करता येतं. यामुळे हे दोन्ही अॅप कोरोनाच्या लढाईत उपयुक्त ठरत आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर या दोन्ही अॅपचा कसा फायदा होतो, पाहावं लागेल.

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी

एकीकडे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.

वाचा - मुंबईत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, 3585 व्यक्तींच्या चाचणीत 5 जणं बाधित

मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते 83 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले.

9 मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण 14 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर 23 मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अन्य बातम्या

भारतात एकमेव असं राज्य जिथं कोरोनाला 'नो एन्ट्री', सरकारनं 'अशी' घेतली खबरदारी

लॉकडाऊनमध्ये राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

'तुम्ही सांगा फक्त कुठे आणि कधी?' पुणे पोलिसांचं उत्तर पाहून म्हणाल 'मानलं!'

First published: April 16, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading