चांगली बातमी! मुंबईत कोरोनाचे 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नाही, 3585 व्यक्तींच्या चाचणीत केवळ 5 जणं बाधित

कोरोनाबाधित पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्ट्री' असणारे वा ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांच्या संपर्कात होते

कोरोनाबाधित पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्ट्री' असणारे वा ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांच्या संपर्कात होते

  • Share this:
    मुंबई, 16 एप्रिल :  कोविड - 19 (Coronavirus) या आजारास प्रभावी प्रतिबंध होण्यासाठी बाधित व्यक्तींचे निदान व विलगीकरण लवकरात लवकर करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बाधित रुग्णांचा शोध घेत आहे. यासाठी मुंबई पालिका क्षेत्रातील 97 फिव्हर क्लीनिक उभारण्यात आले असून काही दिवसांपूर्वी दूरध्वनी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या भागात  कोविड 19 (Covid - 19) च्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, अशा 'कंटेनमेंट झोन' परिसरात किंवा त्यालगतच्या परिसरात महापालिकेद्वारे 'फिव्हर क्लिनीक'चे आयोजन करण्यात येत आहे. या 'क्लिनीक'मध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या 'क्लिनीक'मध्ये आजवर 3585 व्यक्तींची कोरोना प्राथमिक तपासणी करण्यात आली. ज्यापैकी निर्धारित निकषांनुसार 912 व्यक्तींचे नमुने आवश्यक त्या तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर 5 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. हे पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्ट्री' असणारे वा ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांच्या संपर्कात होते. याचाच अर्थ 0.54 टक्के अर्थात सुमारे अर्धा टक्के लोक बाधित आढळून आले. बाधित व्यक्तींची ही आकडेवारी लक्षात घेतल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'सामुदायिक संसर्ग' (Community Transmission) नसल्याचे स्पष्ट होते. वैद्यकीय मार्गदर्शनासाठी पालिकेची दूरध्वनी हेल्पलाइन ६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी घेतला लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे. दूरध्वनी क्रमांक '०२०-४७०-८५-०-८५' यावर सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना प्राप्त होत आहे. ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे, अशी लक्षणे जाणवत असतील; त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेऊ शकता. संबंधित - जगाच्या Covid - 19 लढ्यात भारताची साथ, मॉरिशस सरकारने मानले PM मोदींचे आभार मुंबई फायर ब्रिगेड मुख्यालयात कोरोनाची एन्ट्री, अधिकाऱ्याच्या पत्नी-मुलीला लागण   संपादन - मीनल गांगुर्डे
    First published: