भारतात एकमेव असं राज्य जिथं कोरोनाला 'नो एन्ट्री', सरकारनं 'अशी' घेतली खबरदारी

मात्र अद्याप अशी एकही केस समोर आलेली नाही की ज्याच्या आधारावर हा दावा केला जाईल की कोरोना व्हायरस डास चावल्यानं होऊ शकतो.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने विळखा घातला आहे. असे असतानाही देशातील एक राज्य असंही आहे ज्या ठिकाणी अद्याप कोरोना पोहोचू शकला नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसनं जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढत असताना जगात काही भाग असेही आहेत जिथं कोरोना अद्याप पोहोचू शकलेला नाही. जगातील काही देशांसह भारतातील एकमेव राज्य असं आहे जिथं कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही. या राज्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सुरुवातीलाच खबरदारी घेतल्यानं कोरोना या राज्यात पसरू शकला नाही. जगातील मोठ्या देशांना कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. काही देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 15 ते 20 हजारांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत लहान देशांनी मात्र यापासून वेळीच सावध होत योग्य ती खबरदारी घेतली. याचाच परिणाम म्हणून जगातील लहान देश यातून वाचले आहेत. कोरोमास, किरीबाती, लेसोटो, मार्शल आयर्लंड, मायक्रोनेशिया या देशात एकही कोरोनाचा रुग्ण  आढळलेला नाही. काही देश असे आहेत ज्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळूनही एकही मृत्यू झाला नाही. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसत आहे. सुरुवातीला करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, भारतातल्या 28 राज्यांपैकी एक राज्य असंही आहे जिथं कोरोनाचा एकही रुग्ण नाही. ज्यावेळी जग कोरोनाला साथीचा आजार घोषित करायचं की नाही यावर विचार करत होतं तेव्हाच या राज्यानं खबरदारीचे उपाय सुरू केले होते. सिक्किम प्रशासनाने राज्यात 27 जानेवारीलाच सर्व ठिकाणी स्क्रीनिंग बंधनकारक केलं होतं. यामुळेच कोरोनाला रोखण्यात ते यशस्वी ठरले. पश्चिम बंगाल आणि आसाममधील प्रयोगशाळांमध्ये 70 जास्त चाचण्या सिक्किमच्या केल्या. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. हे वाचा : '1500 किमी अंतर पायी चालत जावू', पण..,उत्तर प्रदेशच्या मजुरांचं धक्कादायक वास्तव सिक्किमने परदेश प्रवास करणाऱ्यांना सरकारी क्वारंटाइनची सुविधा पुरवली तसंच त्यांना सेल्फ आयसोलेशनसाठी प्रोत्साहन दिलं. लोकांनीही यामध्ये सहकार्य करत गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं. सिक्किमने 5 मार्चला परदेशी नागरिकांना प्रवेश बंदी केली. तसंच देशात लॉकडाऊन घोषित करण्याआधई 17 मार्चला राज्यातील शाळा, महाविद्यालये याशिवाय गर्दी होणारी ठिकाणं बंद केली. त्यानंतर देशातून राज्यात परत येणाऱ्या लोकांना 14 दिवस सेल्फ आयसोलेट केलं. त्यांना देखरेखीखाली ठेवलं. प्रवासाची माहिती लपवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आणि यामुळे सिक्किममध्ये कोरोनाला पाऊलही टाकता आलं नाही. हे वाचा : 'तुम्ही सांगा फक्त कुठे आणि कधी?' पुणे पोलिसांचं उत्तर पाहून म्हणाल 'मानलं!' संपादन - सूरज यादव
    First published: