पुणे, 16 एप्रिल : पुणेकरांचं वाक्चातुर्य, सडेतोड किंवा थोडासा उर्मटपणा आणि त्यावरचे विनोद सोशल मीडियावर फिरत असतात. पण पुणे पोलीसही अस्सल पुणेकरासारखी उत्तर देत असतील, तर… पुणे पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे मजेदार किस्से बघायला मिळतील. पुणे पोलिसांचं Twitter अकाउंट चांगलं अॅक्टिव्ह आहे. तिथे घडलेला एक किस्सा सध्या सगळ्या सोशल मीडियात सध्या फिरतो आहे. एकमेकांना भेटण्यासाठी बाहेर पडायचे बेत आखणाऱ्या मित्रांना पोलिसांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही त्यांना म्हणाल - मानलं! पार्थ आणि जग्गू नावानं Twitter अकाउंट असणाऱ्या दोन मित्रांमध्ये या सोशल मीडियावरच संवाद सुरू होता. ते भेटायचे बेत आखत होते, असं त्यांच्या ऑनलाइन संभाषणावरून समजतं. Coronavirus चा फैलाव कमी व्हावा म्हणून लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे भेटायचे बेत रद्द झाले असावेत. आता 3 मे पर्यंत शक्य नाही, असं त्यातला एक जण म्हणतो. पण दुसरा लगेच त्यावर आत्ता भेटू या का… तू एक रस्ता सोडला की राहतोस. आता या थ्रेडमध्ये याच वेळी पुणे पोलिसांची एंट्री होते.
असं एका मित्राने लिहिल्यावर त्यावर पुणे पोलिसांनी काय उत्तर लिहिलंय वाचा.
Hey! Even we'd like to join and give you company for longer! Tumhi saanga fakt kuthe ani kadhi? https://t.co/TnJOROnmgy
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) April 14, 2020
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सध्या पुण्यात सुरू आहे. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडायला बंदी आहे. तुम्ही भेटणार असाल तर आम्हीही तुमच्याबरोबर बराच वेळ भेटायला तयार आहोत. फक्त कधी आणि कुठे सांगा, असं उत्तर पोलिसांनी या जग्गूच्या ट्वीटला दिलं आणि सोशल मीडियावर पुणे पोलिसांच्या कर्तव्यावरच्या हजरजबाबीपणाबद्दल प्रतिक्रियांचा पाऊस पडला. हा संवादाचा थ्रेड प्रचंड व्हायरल झाला. काही जण अशा पद्धतीने वायफळ गोष्टीत वेळ घालवल्याबद्दल पुणे पोलिसांना दूषणं देत होते, तर काहींनी मात्र पुणे पोलिसांच्या विनोबुद्धीला आणि हजरजबाबीपणाला मोठी दाद दिली. अन्य बातम्या ड्रेस इस्त्री केला नाही म्हणून करिनानं स्टाफवर काढला राग, व्हायरल झाला VIDEO ‘1500 किमी अंतर पायी चालत जावू’, पण..,उत्तर प्रदेशच्या मजुरांचं धक्कादायक वास्तव एका मिनिटांत पाहा कसा पसरतो कोरोना, चिमुकल्यांचा VIDEO मोदींनी केला शेअर