Home /News /mumbai /

लॉकडाऊनमध्ये राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

लॉकडाऊनमध्ये राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात येत्या 21 तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल...

मुंबई, 16 एप्रिल: केंद्र शासनाने उद्योगाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून तसेच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात येत्या 21 तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली. राज्यातील उद्योग सुरू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उद्योग विभागाच्या कृतीगटातील अधिकाऱ्यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एनआरएचचे संचालक एम अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. यावेळी राज्यातील उद्योगांचा आढावा घेण्यात आला. हेही वाचा..चक्क स्वर्गरथ घेऊन रस्त्यावर उतरले यमराज, म्हणाले मास्क लावा..घरातच थांबा! सुभाष देसाई म्हणाले की, केंद्र सरकारने कालच मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. उद्योगांना आर्थिकदृष्ट्या चालना मिळावी, यासाठी मार्गदर्शक सूचना महत्वाच्या आहेत. त्याचा विचार करून आम्ही उद्योग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यायचे यावर चर्चा केली. आजच्या बैठकीत उद्योग सुरू करण्याबाबत सूत्र तयार करण्याचे ठरवले. ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागु आहेत. अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भिवंडी पुणे- चिंचवड, नागपूर या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी बंधने कायम राहील. या व्यतिरिक्त जे भाग आहेत, त्या ठिकाणी परिस्थितीनुसार आरोग्य विभाग स्थानकि प्रशासनाशी सल्लासलत करून 21 तारखेच्या आसपास हे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविली जाईल. हेही वाचा..महाभयंकर Coronavirus चा नाश कधी होणार? शास्त्रज्ञांनी दिलं असं उत्तर साधारणपणे रोजगार गमावलेल्या लोकांना उत्पादनाचे साधन मिळेल, रोजगार मिळेल. हे करताना शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांना पुढील हंगामांसाठी मदत होईल. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी प्रादुर्भाव नाही, या ठिकाणी उद्योगांना चालना कशी देता येईल, यासाठी नियम ठरलले आहे. काही उद्योग जे आपल्या कामागारांना राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना परवानागी दिली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे कोणी नियम पाळतील, वाहतुकीची व्यवस्था कोणी करत असेल त्यांना सूट दिली जाईल. एमआयडीसी मध्ये लघु उद्योग एकत्र आल्यास त्यांच्या राहण्याची मोकळ्या जागेत सोय करता आली तर उद्योग विभाग त्यांना मदत करण्यास तयार आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Coronavirus, Subhash desai

पुढील बातम्या