जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

BREAKING: 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

BREAKING:  3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

ग्रीन झोन क्षेत्रात दुकानं, व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव वाढला आहे त्या जिल्ह्यांना वगळण्यात येणार आहे. तर ज्या जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलं आहे, त्या ग्रीन झोन क्षेत्रातील जिल्ह्यांत 3 मे नंतर सूट देण्याबाबत हालचालींना आता वेग आला आहे. ग्रीन झोन क्षेत्रात दुकानं, व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा - नागपूरमध्ये संतापजनक घटना, पोलिसाला मारहाण करून गाडीची काच फोडली ग्रीन झोन परिसरात दुकानं सुरू करण्याबाबत राज्य सरकर अनुकूल आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मेनंतर  देशातील लॉकडाइन बाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल डिसस्टसिंग नियम पाळून व्यवहार सुरू करता येतील तशी सरकारची भूमिका आहे. फार दिवस सगळे बंद करता येणार नाही. लोकांच्या समस्यांचा विचार करून ग्रीन झोनमध्ये थोडी शिथिलता आणण्याचा विचार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मुंबई-पुण्यात लॉकडाउन कायम? मागील सोमवारी 27 एप्रिल रोजी लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे. हेही वाचा - गाडी पकडताच रडत सांगितलं आजोबांचं निधन झालं, पण पोलिसांनी खरी माहिती काढली आणि.. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही राजधानी मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाउन वाढवायचा असेल तर तो  मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहे, त्यांचाही समावेश लॉकडाउन 3 मध्ये असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाउन हा आणखी दोन आठवड्यांसाठी असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात