• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • गाडी पकडताच रडत सांगितलं आजोबांचं निधन झालं, पण पोलिसांनी खरी माहिती काढली आणि...

गाडी पकडताच रडत सांगितलं आजोबांचं निधन झालं, पण पोलिसांनी खरी माहिती काढली आणि...

ताब्यात घेतल्यानंतर त्याला खेड मध्येच १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे

  • Share this:
खेड, 30 एप्रिल : लॉकडाउनमध्ये लोकांनी घरीचं राहावं असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. पण तरीही घरी जाण्यासाठी लोकं बाहेर पडत आहे. घरी जाण्यासाठी एका तरुणाने पोलिसांना दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले. मुंबई आणि ठाणे येथे कोरोनाचा धोका वाढल्याने लोक वाटेल ते कारण सांगत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करत कोकणात येऊ लागले आहेत. अंबरनाथ येथील तरुणाने रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे जाण्यासाठी चक्क आजोबांचे निधन झाल्याचे कारण सांगून तसंच त्यांचा जुना फोटो पोलिसांना दाखवून मुंबई ते राजापूर असा आलिशान गाडीने प्रवास केला. पण या तरुणाला मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटात खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. हेही वाचा - अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे ताब्यात घेतल्यानंतर  त्याला खेड मध्येच १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे. तसंच त्याची कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या तरुणाला आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान कशेडी घाटात खेड पोलिसांनी अडवले. गाडीतून उतरल्यानंतर त्या मुलाने अक्षरशः रडायला सुरुवात केली. त्या ठिकाणी ड्युटीवर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी विचारपूस केली असता. आजोबा रात्री वारल्याचे त्याने सांगितले तसंच त्याच्या मोबाईलवर फोटो देखील दाखवला. हेही वाचा - पुण्यातून आली धक्कादायक आकडेवारी, रात्र ठरली धोकादायक! पोलिसांनी खात्री केली असता हा फोटो जुनाच असल्याचे निदर्शनास आले. तरीही पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात संपर्क करून त्याच्या पत्यावरून वस्तुस्थिती जाणून घेतली हा तरुण गावी जाण्यासाठी आजोबांचं निधन झाल्याचं खोटे सांगत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अंबरनाथ येथून पोलिसांना चकवा देत इथपर्यंत आलेल्या त्या तरुणाला खेड पोलिसांनी 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल कोरोनटाईन केलं आहे. तसंच त्याची कार देखील जप्त केली आहे, या आधी देखील असाच प्रकार खेड पोलिसांच्या दक्षतेने उघड झाला होता.  संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published: