• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • काल अमित शहांची भेट आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, केली महत्त्वाची मागणी

काल अमित शहांची भेट आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, केली महत्त्वाची मागणी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

 • Share this:
    मुंबई, 27 सप्टेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांनी नुकताच दिल्लीच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेऊन आले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे.  'मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या (High speed railway) कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसंच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत. अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. (cm Uddhav Thackeray letter to Pm narendra modi ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशियात जबरदस्त हिमवृष्टी; भर शहरात दीड फुटांपर्यंत साठलाय बर्फ! पाहा PHOTOS 'प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरू करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल' असं मुख्यमंत्री म्हणाले. 9 ते 5 ची नोकरी नको गं बाई! महिलेने शोधला नवा मार्ग, आता कमावते लाखो रुपये! 'याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक लाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकाना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीडने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकाना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल' अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे केली.
  Published by:sachin Salve
  First published: