मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

9 ते 5 ची नोकरी नको गं बाई! महिलेने शोधला नवा मार्ग, आता कमावते लाखो रुपये!

9 ते 5 ची नोकरी नको गं बाई! महिलेने शोधला नवा मार्ग, आता कमावते लाखो रुपये!

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांपैकी बहुतांश जण आपल्या नोकरीत कंटाळलेले असतात. अनेक जण कामाचा ताण आणि बॉसचं राग या गोष्टींमुळे आपली नोकरी सोडण्याचा विचार करतात.

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांपैकी बहुतांश जण आपल्या नोकरीत कंटाळलेले असतात. अनेक जण कामाचा ताण आणि बॉसचं राग या गोष्टींमुळे आपली नोकरी सोडण्याचा विचार करतात.

खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांपैकी बहुतांश जण आपल्या नोकरीत कंटाळलेले असतात. अनेक जण कामाचा ताण आणि बॉसचं राग या गोष्टींमुळे आपली नोकरी सोडण्याचा विचार करतात.

इंग्लंड, 27 सप्टेंबर : खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांपैकी बहुतांश जण आपल्या नोकरीत कंटाळलेले असतात. अनेक जण कामाचा ताण आणि बॉसचं राग या गोष्टींमुळे आपली नोकरी सोडण्याचा विचार करतात; मात्र त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्याने तीच नोकरी करत राहण्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्याकडे नसतो. इंग्लंडमधल्या (England) हार्टलपूल (Hartlepool) इथे राहणाऱ्या 42 वर्षांच्या बेकी शार्प नावाच्या महिलेच्या बाबतीतही तसंच झालं. 9 ते 5 च्या नियमित नोकरीला ती कंटाळली होती आणि नोकरी सोडू इच्छित होती. तेव्हाच तिने आपल्या चुलत बहिणीसोबत मिळून एक वेबसाइट सुरू केली आणि आज ती महिन्याला लाखो रुपये कमावते.

बेकी शार्प (Baccy Sharp) एका कंपनीत पेरोल मॅनेजर म्हणून काम करायच्या. त्या नोकरीला त्या कंटाळल्या होत्या. तेव्हाच त्यांना कळलं, की त्यांची चुलत बहीण चेल्सी फर्गसनच्या आईला कॅन्सर आहे आणि त्यांच्या उपचारांसाठी बरेच पैसे लागणार आहेत. त्यामुळे बेकी यांनी चेल्सीला मदत करायचं ठरवलं. तेव्हा चेल्सीने बेकी यांना सांगितलं, की ती तिच्या आईच्या उपचारांसाठी पैसे गोळा करण्यासाठी सेक्स वर्कर्सची एक वेबसाइट सुरू करणार आहे. चेल्सी स्वतःदेखील एक स्ट्रिपर म्हणून काम करायची. त्यामुळे बेकीला याची माहिती होती, की अशा प्रकारचे बिझनेस सूट-बूट घातलेले पुरुषच चालवतात आणि ते महिलांचा काहीही विचार करत नाहीत, केवळ स्वतःचाच फायदा पाहतात. म्हणूनच बेकी आणि चेल्सी यांनी वेगळ्या प्रकारची अॅडल्स वेबसाइट (Adult Website) तयार करण्याचा निर्णय घेतला. ती साइट अॅडल्ट कंटेंट क्रिएटर्ससाठी (Adult Content Creators) सुरक्षित असेल आणि त्यांचा फायदाही (Safe & Profitable) करून देईल, अशी असेल, अशा पद्धतीने ती तयार करायचं या दोघींनी ठरवलं.

हे ही वाचा-Latest IT Jobs: 'या' टॉप 4 IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी

2018 साली या दोघींनी मिळून अॅडमायर मी डॉट व्हीआयपी (AdmireMe.VIP) या नावाची एक वेबसाइट सुरू केली. आता बेकी या वेबसाइटच्या सीईओ आहेत. ओन्लीफॅन्स (Onlyfans) नावाच्या अॅडल्ट सबस्क्रिप्शन साइटला 'अॅडमायर मी' या वेबसाइटने अल्पावधीतच स्पर्धा निर्माण केली. काही आठवड्यांतच बेकी यांना आपली नोकरी सोडून पूर्ण वेळ या वेबसाइटच्या कामाला वाहून घ्यावं लागलं. थोड्याच कालावधीत या दोघी बहिणींनी या वेबसाइटच्या माध्यमातून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली.

आता त्यांच्या या कंपनीत 15 व्यक्ती काम करतात. बेकी यांच्या दोन मुली, त्यांची आई आणि बहीण अशा सर्व जणी मिळून ही वेबसाइट चालवतात. हार्टलपूलमध्येच त्यांनी आपल्या कंपनीचं मुख्यालय सुरू केलं आहे. ही कंपनी सेक्स वर्क करणाऱ्या महिलांचा विचार करते. कारण ही कंपनी महिलाच चालवत आहेत, असं बेकी म्हणतात. पुरुष चालवत असलेल्या अन्य कंपन्यांप्रमाणे ही कंपनी नाही.

बेकी म्हणाल्या, की 'माझी बहीण चेल्सी हिने स्वतःही स्ट्रिपर (Stripper) म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे सेक्स वर्कर्ससाठी (Sex Workers) आमच्या मनात आपलेपणा आहे. त्यामुळे आम्ही कंटेंट क्रिएटर्सनाही (Content Creators) चांगले पैसे देतो आणि वेबसाइट सुधारण्यासाठी, ती चांगली चालण्यासाठीही भरपूर पैसे खर्च करतो.'

First published:

Tags: England, Job, Website, Women empowerment