मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाही, घटकपक्षाच्या नेत्याने वाचला तक्रारीचा पाढा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाही, घटकपक्षाच्या नेत्याने वाचला तक्रारीचा पाढा

 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यात संपत्तीच्या माहितीबद्दल तफावत दिसून आली.

'भिवंडीमध्ये जितेंद्र आव्हाड त्यांच्या मनाला येईल तसे अधिकारी बदलतात. आम्ही जनतेच्या प्रश्नावर भेट मागतो तर हे फोन पण उचलत नाही'

मुंबई, 30 जून: महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) एकीकडे बैठका सुरू असून कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महविकास आघाडीतील आणखी एक घटक पक्ष नाराज झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) भेट देत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

अबू आझमी यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाही. आदित्य ठाकरे सुद्धा जनतेच्या प्रश्नावर भेट देत नाही. गणपती उत्सवाला वेळ आहे तरी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. पण बकरी ईद जवळ आली असतानाही नियमावली जाहीर करत नाही, असं म्हणत अबू आझमींना नाराजीला वाट मोकळी करून दिली.

दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा खालावली; ICU मध्ये केलं दाखल

'भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या मनाला येईल तसे अधिकारी बदलतात. आम्ही जनतेच्या प्रश्नावर भेट मागतो तर हे फोन पण उचलत नाही' असा आरोपही अबू आझमींनी केला.

यांचा मुस्लिम लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी महाविकास आघाडीतील पक्ष करत होते. पण आता स्वतःच सरकार आले तरी काही करत नाही, अशी खंतही आझमींनी बोलून दाखवली.

राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

'तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काम करावे आणि हे सरकार ५ वर्ष चालवावे. माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे मला जे सेक्युलर असण्याचा दिखावा करतात त्यांच्याबरोबर राहावे लागते. शिवसेनेनं सरकार चालावं म्हणून सेक्युलर असण्याचे दाखवते. त्यांना भीती वाटते कि त्यांचे कट्टर विचारधारेचे लोक त्यांना मतदान करणार नाही म्हणून मध्ये मध्ये हिंदुत्व आणतात', अशी टीकाही आझमींनी केली.

First published:

Tags: Abu azmi, Cm, Maharashtra, Uddhav thackeray, उद्धव ठाकरे