मुंबई, 30 जून- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता (Bollywood Actor) दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्याबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते ICU मध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे. काल दिवसभर सतत त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ 10 दिवसांपूर्वीचं त्यांना रुग्नालयातून घरी पाठवण्यात आलं होतं. 98 वर्षांच्या असणाऱ्या दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना 6 जूनलादेखील रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. मात्र त्यांच्या डॉक्टरांकडून अजून कोणतीही अपडेट मिळालेली नाही.
(हे वाचा: राज कौशल यांची ही पार्टी ठरली शेवटची; अवघ्या दोनच दिवसात आनंदावर विरजण )
98 वर्षांच्या असणाऱ्या दिलीप कुमार यांना सतत श्वास घेण्यासाठी अडचण होतं असते. त्यांना अनेकवेळा रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत. त्यांच्या तब्येतीबद्दल अभिनेत्री आणि पत्नी सायरा बानो सतत चाहत्यांना अपडेट देत असतात. आणि चाहतेसुद्धा सतत त्यांच्या आरोग्यसाठी प्रार्थना करत असतात.
(हे वाचा:मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन )
1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Bollywood actor, Dilip kumar, Entertainment