मुंबई, 19 जून : बीएमसीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबवण्यात आलेल्या विविध कामांमध्ये 12 हजार 24 कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचं कॅगनं विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिलंय. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिलं होतं. तर कॅगच्या अहवालातील काही भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखविला होता. ‘मर्यादेत राहा, कुवतीत राहा’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा मुख्यमंत्र्यांचा इशारा दरम्यान शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमातही एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतल्या अनियमिततेवरून थेट इशारा दिला आहे. सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल, असं सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







