मुंबई, 19 जून : शिवसेनच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. कोविडमध्ये माणसं मरत होती तेव्हा तुम्ही पैसे बनवत होते, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. वर्षामधून निघताना मानेला पट्टा बांधला होता, दुसऱ्या दिवशी पट्टा गायब, ही करामत डॉ.एकनाथ शिंदे यांची आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. ‘मोदी-शाह कुठी तुम्ही कुठे? जेव्हा एक नोटीस आली तेव्हा दिल्लीला मोदी साहेबांना भेटायला गेलात, शिष्टमंडळ बाहेर आणि शिष्टाई करायला तुम्ही आतमध्ये गेलात. ते जोपर्यंत बघत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. आपल्या मर्यादेत राहा, कुवतीमध्ये राहा. तुम्ही वर्षामधून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही,’ असा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. ‘ठाकरेंना असुरक्षितता वाटत होतं, त्यांना मास लिडर नको होता, त्यांना दरबारी राजकारण पाहिजे होतं. चांगलं भाषण करायला लागला की त्याचं भाषण कट. एवढे लोक जातायत त्याचं आत्मपरिक्षण करा, का एवढी इनसिक्युरीटी. 50 खोके 50 खोके, लाखो लोकं आले, एवढे खोके कुठून येतील? त्यांना खोके माहिती आहेत, एक दिवस जनतेसमोर खोके आल्याशिवाय राहणार नाही. सगळं बाहेर येईल’, असं सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं. एकापेक्षा एक अवली, इथं लवली कुणीच नाही, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रतिस्पर्धी तयार करत होतात. भांडणं लावायची, मजा बघायची हे पक्षप्रमुखाचं काम नसतं. मनोहर जोशींना व्यासपीठावरून कारस्थानं, अपमान करून घरी जायला लावण्याचं पाप तुम्ही केलंत. तुम्ही आम्हाला घरगडी समजता का? नोकर समजता? याच रिक्षाने तुमच्या मर्सिडिजला खड्ड्यात घातलं, ही सर्वसामन्यांची रिक्षा आहे, नादी लागू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्हीच केलीत गद्दारी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तोडले. आमच्यावर आरोप करताय, पण तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. मतदारांशी द्रोह केला त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्यांच्याकडे असेल तोपर्यंत चांगले, जो गेला तो कचरा. एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तुम्ही सरकार चालवायचं सोडून गाडी चालवत होता. मी गाडीतून जातो तेव्हा फाईली सह्या करायला घेऊन जातो. रस्त्यात सही करतो. अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते, माझ्याकडे दोन दोन पेन आहेत, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. ‘एक यादी पाठवून द्या’, मनीषा कायंदे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची शिंदेंना नवी ऑफर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







