Home /News /mumbai /

BREAKING NEWS: विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

BREAKING NEWS: विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 05 जुलै: पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून मोठा राडा पाहण्यास मिळाला. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (MVA government) आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण बोलू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. 28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo छगन भुजबळ यांनी ठराव मांडला त्यावर, अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने फडणवीस यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. भाजपा आमदार सभागृहात गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. 'तू खरंच प्रेम केलं का'? युवकानं GF सोबत केलेलं कृत्य पाहून न्यायाधीशही हैराण यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे  काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Governor bhagat singh, Maharashtra, Monsoon, Mumbai, PM narendra modi, Pune, Season, Session, Uddhav thackeray

    पुढील बातम्या