Home /News /crime /

'तू खरंच प्रेम केलं का'? युवकानं एक्स गर्लफ्रेंडसोबत केलेलं भयंकर कृत्य पाहून न्यायाधीशांनी विचारला सवाल

'तू खरंच प्रेम केलं का'? युवकानं एक्स गर्लफ्रेंडसोबत केलेलं भयंकर कृत्य पाहून न्यायाधीशांनी विचारला सवाल

या व्यक्तीनं महिलेवर चाकूनं 47 वेळा वार केले. यानंतर तिथेच उभा राहून तो पीडितेला तडफडताना पाहात राहिला.

    नवी दिल्ली 05 जुलै : हत्येचं एक हृदय पिळवटणारं प्रकरण समोर आलं आहे. इथे एका व्यक्तीनं आपल्या एक्स गर्लफ्रेंडची अतिशय निर्घृणपणे हत्या केली (Man Stabbed His Ex-Girlfriend With a Knife) आहे. या व्यक्तीनं महिलेवर चाकूनं 47 वेळा वार केले. यानंतर तिथेच उभा राहून तो पीडितेला तडफडताना पाहात राहिला. इतकंच नाही तर तो तिचा व्हिडिओ तोपर्यंत रेकॉर्ड करता राहिली जोपर्यंत तिच्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब खाली पडत नाही. ही भयंकर घटना कॅनडामध्ये (Canada) घडली आहे. पुण्यात साऊथ फिल्मचा थरार; टोळक्यानं काठी, तलवारीनं वार करत दोघांना दगडानं ठेचलं द सननं दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या एक्स गर्लफ्रेंडची हत्या (Murder) करणाऱ्या या व्यक्तीचं नाव जेन असं आहे. त्यानं 34 वर्षीय निकोल हिची निर्घृण हत्या केली आहे. निकोलला एक दहा वर्षांचा मुलगादेखील होता. न्यायालयानं याप्रकरणी जेनला पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनला या गोष्टीची भनक लागली की त्याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर निकोल दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. यानंतर त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं बदला घेण्याचं ठरवलं. प्रेयसीच्या प्रेमासाठी कायपण! बहाद्दरानं मित्राच्या मदतीनं पत्नीला संपवलं एक दिवस जेन निकोलला काहीतरी कारण सांगून आपल्यासोबत बाहेर घेऊन गेला आणि याचवेळी कारच्या मागच्या सीटवर त्यानं निकोलची हत्या केली. जेननं निकोलवर धारदार शस्त्रानं 47 वेळा वार केले, यातच तिचा मृत्यू झाला. आरोपी जेनला शिक्षा सुनावताना न्यायालयानं म्हटलं, की हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. या घटनेनंतर जेनला काहीच भावना नाहीत, असं जाणवतं. कदाचित त्यानं निकोलवर कधी प्रेमच केलं नव्हतं. कोणी इतकं निर्दयी कसं असं शकतं? न्यायालयात सुनावणीदरम्यान निकोलच्या मित्र-मैत्रीणींची पत्रंही वाचली गेली. निकोलची खास मैत्रिण ऐशले हिनं लिहिलं होतं, की जेन कधी निकोलला भेटलाच नसता तर किती बरं झालं असतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder, Murder news

    पुढील बातम्या