Home /News /mumbai /

भाजप नेत्यांकडूनच गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा आरोप

भाजप नेत्यांकडूनच गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा आरोप

'दुसऱ्यांदा जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार होते, त्यावेळी सुद्धा गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले होते'

    मुंबई, 05 जुलै: पावसाळी अधिवेशनाला (monsoon season Maharashtra) आजपासून सुरुवात होत आहे. पण, त्याआधी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'साखर कारखान्यांच्या चौकशीची मागणी करून भाजपचे नेते नितीन गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे' अशी टीका राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. विधानभवनात पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी सुधारीत कृषी विधेयक आणले जाईल, अशी माहितीही मलिक यांनी दिली. 'कुणी काय तक्रार करत आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आरोप करत असताना यापूर्वी पण किरीट सोम्यांनी आरोप केले आहे. आता चंद्रकांत पाटील हे सुद्धा गडकरींवर आरोप करत आहे. त्यामुळे गडकरी यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे असं दिसून येत आहे, असंही मलिक म्हणाले. VIDEO : बिचाऱ्या पतीची पत्नीनं केली वाईट अवस्था; मस्करीत केलेलं कृत्य व्हायरल 'दुसऱ्यांदा जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार होते, त्यावेळी सुद्धा गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गडकरींना अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले, आता पुन्हा एकदा गडकरींवर आरोप केले जात असल्यामुळे भाजपमधील अंतर्गत दिसून येत आहे', असंही मलिक म्हणाले. 'मन मिळाली नाही तरी चालले पण हातातून हात मिळाले पाहिजे. राजकारणात कटूता आणि शत्रूता कायम नसते. जर मनभेद असतील तर बोलून त्यावर मार्ग काढला पाहिजे. जर मनातलं बोलून नाते सुधारत असतील तर ही चांगली गोष्ट आहे', असं म्हणत मलिक यांनी फडणवीस यांना टोला लगावला. ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, पुण्यातल्या गुंडगिरीचा LIVE VIDEO 'धर्म यावर राजकारण आम्ही मानत नाही. भागवतांचे मत परिवर्तन होत असेल तर चांगले आहे. फक्त विधानांमध्ये बदल नको कर कृती हवी, मुह मे राम बगल छुरी असं नको', अशी प्रतिक्रिया मलिक यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर दिली. देशात तीन कृषी कायदे केले. आजही या कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. सुप्रीम कोर्टानेही या कायद्यांना स्थगिती दिली आहे. essential commodity act नुसार किती साथ ठेवायचा त्याला लिमिट राहणार नाही. पण मागच्या शुक्रवारी स्टोक लिमिटबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे, त्यामुळे हे कायदे मान्य नसताना केंद्राने कायदे रद्द करावे, अशी मागणी मलिक यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrakant patil, Maharashtra, Monsoon, Mumbai, Nawab malik, NCP, Nitin gadkari, Pune, Season

    पुढील बातम्या