Home /News /pune /

पुण्यात भररस्त्यात धारदार शस्त्र घेऊन लोकांवर वार करणाऱ्या गुंडांचा VIDEO VIRAL, दोघे जण अटकेत

पुण्यात भररस्त्यात धारदार शस्त्र घेऊन लोकांवर वार करणाऱ्या गुंडांचा VIDEO VIRAL, दोघे जण अटकेत

Pune Crime Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे. हो, महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील आहे.

    पुणे, 05 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत (Viral Video) गुंड भररस्त्यात धारदार शस्त्र घेऊन फिरत आहेत. हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल की, हा व्हिडिओ बिहारचा आहे. पण तसं नसून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे. हो, महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील आहे. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात क्राईमचे (Pune Crime) टक्केवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. गुंडांच्या दहशतीचा काळजाचा थरकाप उडविणारा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसताहेत. ते समोर दिसेल त्याच्यावर वार करीत आहेत. सांगवी परिसरातील पिंपळे निळखमध्ये काल रात्री हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Shocking viral video) दरम्यान शस्त्राचा धाक दाखवत भर रस्त्यात हैदोस घालणाऱ्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलिसांनी कारवाई केली असून दाखल गुन्ह्या प्रमाणे कठोर कारवाई करणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितलं आहे. हे तरुण दारुच्या नशेत आहेत. आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यात धिंगाणा घालत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, रस्त्याच्या दोन्ही बाजूनं येणाऱ्या वाहन चालकांना धमकावून त्यांच्यावर वार करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतीक खरात आणि चेतन जावरे अशी दहशत माजवणाऱ्या तरुणांची नावं आहेत. सध्या हे दोघंही फरार आहेत. त्यातील एका व्यक्तीविरोधात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि दहशत पसरवण्यासाठी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हेही वाचा- चिंताजनक बातमी:  राज्यातल्या 'या' चार जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती दोघांनीही दारुच्या नशेत हे कृत्य केलं असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र या आरोपींनी त्यांच्याकडच्या धारदार शस्त्रानं एकाच्या डोक्यावर जबर वार केल्यानं तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Pune, Videos viral

    पुढील बातम्या