मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : बिचाऱ्या पतीची पत्नीनं केली वाईट अवस्था; मस्करीत केलेलं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : बिचाऱ्या पतीची पत्नीनं केली वाईट अवस्था; मस्करीत केलेलं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती किचनमध्ये (Kitchen) सफाई करत आहे. त्यानं हातात एक कपडा घेतला असून कामात अगदी मग्न होऊन तो किचनची सफाई करत आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ इतके भावनिक असतात की ते पाहूनच डोळ्यात अश्रू येतात. तर, काही व्हिडिओ असे असतात जे पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडिओ (Funny Prank Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून कोणताही पती आपल्या पत्नीच्या मदतीसाठी किचनमध्ये जाण्याआधी दहा वेळा विचार करेल.

Oh no! वरमाळा घालतानाच निसटला नवरदेवाचा पायजमा अन्...; लग्नातील फजितीचा VIDEO

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती किचनमध्ये (Kitchen) सफाई करत आहे. त्यानं हातात एक कपडा घेतला असून कामात अगदी मग्न होऊन तो किचनची सफाई करत आहे. इतक्यात तिथे एक महिला येते. ही महिला बहुतेक त्याची पत्नी असावी. महिलेनं काळ्या रंगाचा बुर्खा घातला आहे आणि तिच्या हातात पाण्याचं एक कॅन (Water Can) आहे. एका लांब दोरीनं बेलण्याला बांधलेलं हे कॅन महिला आपल्या पतीच्या हातात देते. यानंतर ती पिठानं भरलेली एक प्लेट या बेलण्यावर ठेवते. पती याचा ब्लॅन्स मेन्टेन करण्यासाठी अतिशय सावधगिरीनं हे पकडतो.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

पुण्यात हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांची दहशत; काळजाचा थरकाप उडविणारा VIDEO

इतक्यात ही महिला एक कात्री हातात घेते आणि बेलण्याला बांधलेली पाण्याच्या कॅनची दोरी ती कापून टाकते. तिनं असं करताच पिठाची प्लेट उडून या व्यक्तीच्या तोंडवर धडकते आणि त्याचा संपूर्ण चेहरा पिठामुळे पांढरा होतो. यानंतर या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासारखा होतो. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक ही व्हिडिओ क्लिप केवळ शेअर करत नाहीयेत तर यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. व्हिडिओ आतापर्यंत सात हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.

First published:

Tags: Funny video, Social media viral, Video viral