मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

तो अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच कळेल, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

तो अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच कळेल, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार

'संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे'

'संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे'

'संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे'

osमुंबई, 24 मार्च : 'पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबद्दल  (police officer transfer racket) जो अहवाल दिला आहे तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच कळेल', अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जोरदार टोला लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'आपल्याला कल्पना आहे की ज्या घटना सध्या बाहेर येत आहे ते चिंताजनक आहे. त्याही पेक्षा खेदजनक आहे की मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. शरद पवार बोलले पण त्यांनी प्रकरणाचा बचाव केला.  काँग्रेसची भूमिका वेगळीच आहे. केवळ सत्तेसाठी सगळं चालले आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे की त्यांना किती वाट हिस्सा मिळतो ते सांगावे', असा सवाल फडणवीस यांनी काँग्रेसला विचारला.

टायगर कॅपिटलमध्ये एकाच दिवसात सापडले 3 वाघांचे मृतदेह, विदर्भात वन्यजीवन धोक्यात

'आम्ही राज्यपालांना सांगितलं की जर मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलत करावं आणि मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा. मूळ घटना पाहिली पाहिजेच पण त्याच्या पाठीमागे जे चाललं आहे ते ही पाहवाचं लागेल जे बदलीच रॅकेट आणि वसुलीचं जे रॅकेट आहे ते ही पाहावं लागेल. यांच्यात नैतिकता नाही. कारण ज्यांनी प्रकरण पुढे आणलं त्यांच्यावर कारवाई केली पण ज्यांनी यात फायदा घेतलं त्यावर काही कारवाई केली नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली.

इनिंगच्या शेवटी धावांचा पाऊस; मिडल ओव्हरमध्ये विकेट्स, भारताच्या विजयाची 5 कारणं

'हे मनमानी करणार सरकार आहे. कोरोनाकडे तर यांचं लक्षच नाही. मला कळत नाही की महाराष्ट्रातच का कोरोना का वाढतोय. मुनगंटीवार यांनी 100 गोष्टी दाखवून दिल्या आहेत. जेव्हा सरकारने सवैधानिक कर्तव्य बजावले नाही. हा अहवाल बाहेर आल्यानंतर कोणाचे चेहरे पुढे येतील या भीतीने तुम्ही लपवून ठेवलं. ते कोण लोक आहेत, ज्यांच्या वर या माध्यमातून पुढे येणार आहेत. म्हणून तुम्ही लपवून ठेवले', असा आरोपही फडणवीसांनी केली.

'संजय राऊत इतके मोठे नेते नाही की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यावे. केंद्रीय सचिवांकडे जो अहवाल दिला आहे, तो लवंगी फटका आहे की बॉम्ब आहे हे लवकरच कळेल', असा टोला फडणवीसांनी लगावला.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Sanjay raut, देवेंद्र फडणवीस, भाजप