मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: इनिंगच्या शेवटी धावांचा पाऊस तर मिडल ओव्हरमध्ये विकेट्स, भारताच्या विजयाची 5 महत्त्वाची कारणं

IND vs ENG: इनिंगच्या शेवटी धावांचा पाऊस तर मिडल ओव्हरमध्ये विकेट्स, भारताच्या विजयाची 5 महत्त्वाची कारणं

IND vs ENG: टीम इंडियाने टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर वनडे सीरिजमध्ये चांगली सुरुवात केली. टीमने वनडे सामन्यात इंग्लंडचा 66 रन्सनी पराभव केला.

IND vs ENG: टीम इंडियाने टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर वनडे सीरिजमध्ये चांगली सुरुवात केली. टीमने वनडे सामन्यात इंग्लंडचा 66 रन्सनी पराभव केला.

IND vs ENG: टीम इंडियाने टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर वनडे सीरिजमध्ये चांगली सुरुवात केली. टीमने वनडे सामन्यात इंग्लंडचा 66 रन्सनी पराभव केला.

नवी दिल्ली, 24 मार्च: टीम इंडियाने टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर वनडे सीरिजमध्ये (IND vs ENG 1st ODI) चांगली सुरुवात केली. टीमने वनडे सामन्यात इंग्लंडचा 66 रन्सनी पराभव केला. टीम इंडियाने हा सामना सुरुवातीला खेळत 5 विकेट्सवर 317 रन्स केले. शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohli), के.एल. राहुल (KL Rahul) आणि क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) अर्धशतक केले. टीम इंग्लंड 42.1 ओव्हरमध्ये 251 रन्स करत बाद झाली. इंटरनॅशनल डेब्यू करत असलेला फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने चार आणि शार्दुल ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या. आज आपण या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या (Team India) विजयामागची 5 कारणं जाणून घेणार आहोत.

1. टीम इंडियाने या सामन्याची सुरुवात सावकाश केली. पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 39 रन्स केले. मात्र शिखर धवनने टिकून राहत 94 रन्सचा डाव खेळत टीम इंडियाला 200 रन्सपर्यंत पोहचवलं. मधल्या ओव्हरमध्ये कॅप्टन विराट कोहलीनं चांगली कामगिरी केली

2. 40 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोअर 4 विकेटवर 205 रन्स एवढा होता. त्यानंतर हार्दिक पांड्या लवकरच आऊट झाला. मात्र के. एल राहुल आणि पहिला वनडे सामना खेळणारा कृणाल पांड्याने अर्धशतकासह स्कोअर 300 पर्यंत पोहचवला. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 67 रन्स केले आणि स्कोअर 317 पर्यंत पोहचवला

(हे वाचा-IND vs ENG : विराटचं अर्धशतक, आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड खिशात!)

3. ध्येयाचा पाठलाग करत टीम इंग्लंडने वेगवान सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी 135 रन्सची मोठी भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्संनी 30 ओव्हरपर्यंत म्हणजे मधल्या ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेत पुनरागमन केलं. या सामन्यामध्ये 10 पैकी 9 विकेट्स फास्ट बॉलर्संनी घेतले.

4. इंटरनॅशनल डेब्यू करणारा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने चांगली कामगिरी केली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्याने 37 रन्स केले. शेवटी 4 विकेट्स घेत त्याने विजयामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. या व्यतिरिक्त वनडे सामना खेळणारा क्रुणाल पांड्याने अर्धशतक केले आणि बॉलिंग करत एक विकेट सुद्धा घेतली.

(हे वाचा-IND vs ENG : टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, महत्त्वाचे दोन खेळाडू मैदानातच घायाळ)

5. वनडे क्रिकेट सामन्यात मिडल ओव्हर महत्वपूर्ण ठरतो. टीम इंडियाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 39 रन्स केले. तर टीम इंग्लंडने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 89 रन्स केले. म्हणजे टीम इंग्लंडने पहिल्या 10 ओव्हरमध्ये आपल्यापेक्षा 50 रन्स जास्त करुन सुद्धा त्यांचा पराभव झाला. कारण त्यांचे बॅट्समन मधल्या ओव्हरमध्ये चांगली खेळी करु शकले नाहीत.

First published:
top videos

    Tags: IND Vs ENG, Kl rahul, Krunal Pandya, Shikhar dhawan, Team india, Virat kohli