Home /News /mumbai /

Heat wave : जळगावचा पारा 45.5 अंशांवर... विदर्भातही 45 ला टेकला, उष्णतेच्या लाटेचा alert

Heat wave : जळगावचा पारा 45.5 अंशांवर... विदर्भातही 45 ला टेकला, उष्णतेच्या लाटेचा alert

भारतीय हवामान खात्याचे (IMD) अधिकारी आर.के. जेनामनी (RK Jenamani) यांनी महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत उष्णतेची तिव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. लाट प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र नाशिक, जळगाव (Heat wave Nashik, Jalgaon) भागात आणि विदर्भात असल्याचेही ते म्हणाले

पुढे वाचा ...

  मुंबई, 11 मे : मागच्या दोन दिवसांपासून ओडिशा, आंध्रप्रदेश आणि बंगालच्या काही भागात असनी चक्रीवादळाने (Asani cyclone) थैमान घातले आहे. दरम्यान याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावासाचे सावट आहे तर काही भागात दमट वातावरणामुळे उष्णतेच्या झळा बसत आहेत. भारतीय हवामान खात्याचे (IMD) अधिकारी आर.के. जेनामनी (RK Jenamani) यांनी महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत उष्णतेची तिव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. ही लाट प्रामुख्याने  उत्तर महाराष्ट्र नाशिक, जळगाव या (Heat wave Nashik, jalgaon) भागात आणि विदर्भात असल्याचेही ते म्हणाले. (west Rajasthan and Vidarbha are having 44 to 45 degrees Celsius)

  ते पुढे म्हणाले की, असनी चक्रीवादळ मच्छलीपट्टणमच्या पूर्वेच्या दिशेने घोंगावत आहे. आज (दि.11) मे किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात अत्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे जेनामनी यांनी सांंगितले. याचबरोबर आंध्रप्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मनाई आहे. या वादळाची तिव्रता उद्या (12 मे) कमी होण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आल्याचे आर.के. जेनामनी यांनी सांगितले.

  हे ही वाचा : राज ठाकरेंसह बाळा नांदगावकरांना धमकीचं पत्र, पत्रातून जीवे मारण्याची धमकी

  13 आणि 14 मे दरम्यान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (heatwave conditions may develop over Delhi, Punjab, and Haryana) याचबरोबर 16 मेच्या आसपास आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याचा फटका उत्तरेकडील काही राज्याना बसणार असल्याचे जेनामनी म्हणाले. प्रामुख्याने राजधानी दिल्लीत पावसाचा जोर असेल असे IMD शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले.

  सध्या पश्चिम राजस्थान आणि विदर्भात सुमारे 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली जात आहे. दरम्यान  हे तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ ते ४ दिवस ही उष्णतेच्या झळा आणखी तिव्र राहणार आहे. याचबरोबर पश्चिम मध्य प्रदेशातही पुढील 3 दिवस उष्णतेची लाट असू शकते असे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: IMD, IMD FORECAST, Nashik, Rajasthan, Vidarbha

  पुढील बातम्या