मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज ठाकरेंसह बाळा नांदगावकरांना धमकीचं पत्र, पत्रातून जीवे मारण्याची धमकी

राज ठाकरेंसह बाळा नांदगावकरांना धमकीचं पत्र, पत्रातून जीवे मारण्याची धमकी

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांना धमक्यांचे फोन आले. त्यानंतर आता आणखी एका मनसे नेत्याला धमक्या आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 11 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना काही दिवसांपूर्वी धमक्यांचे फोन आले होते. त्यानंतर आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना धमक्या आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. बाळा नांदगावकर यांना धमकीचं जे पत्र आलं आहे ते हिंदीत आहे मात्र, त्यात उर्दू शब्दांचाही उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या संदर्भात त्यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सकाळी भेट घेतली. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

धमकीच्या पत्रात नेमकं काय?

या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, धमकीचं पत्र आलं आहे. मला तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यासोबतच राज ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी पत्रातून दिली आहे. जीवे मारण्याची धमकीचं पत्र राजसाहेबांना काल दाखवलं. काल संध्याकाळी पोलीस आयुक्त पांडे यांना भेटलो आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सोपवले. आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहूयात.

वाचा : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

अजानच्या विरोधातील भूमिकेचा उल्लेख धमकीच्या पत्रात आहे. हे पत्र कुणाकडून आलं आहे याबाबत मला कल्पना नाहीये. गृहमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली. गृहमंत्र्यांनी मला सांगितलं की, पोलीस आयुक्तांसोबत तात्काळ बोलतो आणि त्यानुसार ते पोलीस आयुक्तांसोबत बोलले. मी इतकेच सांगू इच्चितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राजसाहेब ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मात्र, महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. याची दखल राज्य सरकारने घ्यावी असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

जे पत्र आलं आहे त्यावर पोलीस दखल घेतील. पत्र हिंदीमध्ये आहे आणि त्यात काही उर्दूचे शब्द सुद्धा आहेत. राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत केंद्र आणि राज्य सरकारने दखल घ्यावी, भोंग्यांबाबतच्या भूमिका थांबवावी असं पत्रात म्हटलं असल्याचंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Maharashtra News, MNS, Raj Thackeray