• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • सचिन वाझेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गृहमंत्र्यांनी बदलला, फडणवीसांचा आरोप

सचिन वाझेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गृहमंत्र्यांनी बदलला, फडणवीसांचा आरोप

...म्हणून वाझेंना अटक झाली पाहिजे. वाझेंना बाजूला केलं तर अनेक जण अडचणीत येऊ शकतात.

 • Share this:
  मुंबई, 09 मार्च : मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren death case) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन भाजप आक्रमक झाली आहे. 'गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी वाझेंना हटवतो असं आश्वासन दिले होते नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्यासोबत बैठक झाली आणि नाही सांगितलं' असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपन सभागृहात गदारोळ घालत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला. पाहिले न मी तुला : खणाच्या साडीत खुलली 'मनू'; नव्या PHOTO शूटवर चाहते फिदा सभागृहात मनसुख हिरेन यांच्या हत्येबद्दलचा पत्नीचा जबाब मी वाचून दाखवला. हिरन यांची जी गाडी स्फोटकं ठेवण्याकरता वापरण्यात आली ती गाडी वाझेंनी नोव्हेंबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत वापरली होती. तीन दिवस वाझे आणि हिरेन एकत्र होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना हिरेन यांनी लिहिलेलं पत्र वाझेंनी सांगितले होतं'असा दावा  फडणवीस यांनी केला. 'हिरेन यांचे शेवटचं टॉवर लोकेशन धनंजय गावडे यांच्या मालकीच्या जमिनीवर होते.  धनंजय गावडे हे 2017 च्या खंडणी प्रकरणात वाझेंसह सहआरोपी होते. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात आणि नंतर त्यांची हत्या होते. याचा अर्थ तिथेच त्यांची हत्या झाली', असा आरोप फडणवीस यांनी केला. संतापजनक! मोठ्या बहिणीशी लग्न करण्यासाठी धाकटीचं केलं अपहरण,चिमुरडीचा जीव संकटात वाझे हे CIU crime intelligence unit चे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पुरावे हटवायला संधी आहे. म्हणून वाझेंना अटक झाली पाहिजे. वाझेंना बाजूला केलं तर अनेक जण अडचणीत येऊ शकतात. गृहमंत्र्यांनी वाझेंना हटवतो असं आश्वासन दिले होते पण नंतर मुख्यमंत्र्यांसोबत  बैठक झाली आणि नाही सांगितलं, असा आरोपच फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे सरकार पुरस्कृत होतं का? एटीएसच्या आणखी एका अधिकाऱ्याचं यात नाव येत आहे.  या प्रकरणात सरकार पूर्णपणे उघडं पडले आहे, असा टोलाही फडणवीसांना लगावला.
  Published by:sachin Salve
  First published: