मुंबई 21 जून : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. शिवेसेनेचे 11 आमदार नॉट रिचेबल असून ते सध्या सूरतमध्ये आहेत. शिवसेनेचे बडे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील सूरतमध्ये आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय. हे सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासहित अनेक नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांनी ही आपत्कालीन बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात शरद पवारांना यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होईल. शरद पवारांची सकाळच्या सगळ्या अपॉईटमेंट रद्द केल्या आहेत. शरद पवार कालपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. दुपारी अडीच वाजता त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला संजय राऊतही हजर राहणार होते. मात्र त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.