मुंबई, 10 एप्रिल: राज्यावर कोरोना विषाणूचं (Covid-19) मोठं संकट आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1300 वर पोहोचली आहे. त्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. Covid-19चा सामना करताना मुंबई महापालिकेला मनुष्यबळ कमी पडताना दिसत आहे. या रोगाचा सामना करण्यासाठी महापालिकेने नोकर भरतीची जाहिरात काढली आहे. हेही वाचा..
‘लॉकडाऊनमध्ये गरीबाच्या पोटाला नाही घास, मात्र श्रीमंतांना सहलीला मिळतोय पास’
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्य विभागाने Covid-19 चा सामना करण्यासाठी 114 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कक्ष परिचर’ या पदासाठी मुंबईतल्या विशेष रुग्णालयात 114 पदे भरण्यासाठी महापालिकेकडून ही जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठीचा 18 हजार ते 59 हजार इतका पगार निर्धारित करण्यात आला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना या भरतीचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता दहावी पास असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल आहे. म्हणजेच केवळ सात दिवसांच्या कालावधीत 114 पदे भरली जाणार आहे. हेही वाचा..
Coronavirus : न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग, एकत्रच दफन केले जात आहेत शव
ही आहे जाहिरात..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







