न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग, एकत्रच दफन केले जात आहेत शव; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग, एकत्रच दफन केले जात आहेत शव; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात न्यूयॉर्कमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत येथे 7 हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 10 एप्रिल : अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्कमधून धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. येथे कोरोना व्हायरस (Covid - 19) च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. एका दिवसात तब्बल 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत येथे मृतदेहांची रांग लागली आहे. या मृतदेहांना एकत्रित दफन केलं जात आहे. सोशल मीडियात ही फोटो व्हायरल होत आहेत.

मृतदेहांची रांग

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हार्ट ट्विपन येथे अशा लोकांना दफन केले जात आहे. यासाठी मोठ मोठे खड्डे खोदले जात आहेत. आधी येथे आठवड्यात फक्त एकदाच मृतदेहांना दफन करण्यासाठी खड्डे खोदले जात होते. आता मात्र आठवड्यातील पाच दिवस अशा स्वरुपाचे खड्डे  खोदण्याचे काम सुरू आहे. हे प्रमाण इतकं वाढल आहे की आता या कामासाठी बाहेरुन कॉन्ट्रॅक्टर बोलवले जात आहे.

मृतांचा आकडा वाढतोय

कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात न्यूयॉर्कमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत येथे 7 हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्या 10000 ने वाढली आणि हा आकडा 1 लाख 60 हजारांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 16500 लोकांचा मृत्यू झाला असून येथे 4 लाख 62 कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी आणि इन्फेक्शियस डिजीज निर्देशक डॉक्टर एंथनी फौसी यांनी सांगितले की, अमेरिका सरकारने केलेल्या योजनांचा उपयोग होत असून मृतांची संख्या कमी झाली आहे.फौसी हे व्हाइट हाऊसमधील कोरोना व्हायरस टार्स फोर्सचे प्रमुख्य सदस्य आहेत. आम्ही केलेल्या योजनांचा परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित - लॉकडाऊनसंदर्भात रविवारी घेणार मोठा निर्णय, महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता

कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन

 

 

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2020 04:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading