'लॉकडाऊनमध्ये गरीबाच्या पोटाला नाही घास, मात्र श्रीमंतांना सहलीला मिळतोय पास'

'लॉकडाऊनमध्ये गरीबाच्या पोटाला नाही घास, मात्र श्रीमंतांना सहलीला मिळतोय पास'

लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार असून कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरूनच सचिवाने पत्र दिले, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

  • Share this:

शिर्डी, 10 एप्रिल: 'लॉकडाऊन'च्या काळात आर्थिक घोटाळ्यातील आरोपी आणि उद्योजक वाधवान कुटुंबाला खास सवलत दिल्याप्रकरणी आता राज्यात राजकारण सुरु झालं आहे. आरोपी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी सचिव देणार नाही. सरकार अशा आरोपींना पाठीशी घालत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

वाधवान कुटुंबाला कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरून पत्र दिलेत हे सत्य जनतेसमोर यायला हवं अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. जनतेला दिलासा देण्यापेक्षा काही मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टीकाही विखे पाटलांनी केली आहे.

हेही वाचा...मनसेच्या आमदाराने दिली राजेश टोपेंना 'कोरोना' फॉर्म्युल्याची आठवण, म्हणाले...

आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांना पत्र देणाऱ्या सचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार असून कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरूनच सचिवाने पत्र दिले, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सामान्य माणसाच्या पोटाला नाही घास... मात्र, श्रीमंतांना लॉकडाऊनमध्ये सहलीला मिळतोय पास...अशी परिस्थिती असून परवानगी देण्याचं धाडस सचिवात नाही. या प्रकरणाचे सत्य काय आहे, हे जनतेसमोर यावे.

हेही वाचा.. धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, पोलिसांसाठी उभारला पहिला 'सॅनिटायझेशन टेंट'

कोरोनाचं संकट श्रेयवादाची लढाई नाही...

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मुठभर मंडळीचा मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. महामारीत जनतेला दिलासा देण्याची गरज असून कोरोनाचं संकट श्रेयवादाची लढाई नाही, असंही विखे पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्याची जबाबदारी असणारे मंत्रीही मुंबईत तळ ठोकून बसले असून केवळ फक्त प्रसारमाध्यमांसमोर येवून पाठ थोपटून घेवू नका..अपयश आलं तर त्याचा धनी कोण असणार...? असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 10, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या