Home /News /mumbai /

MLC Election Result : शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला! सेनेची 12 मतं फुटली, आजची बैठक ठरणार महत्त्वाची

MLC Election Result : शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला! सेनेची 12 मतं फुटली, आजची बैठक ठरणार महत्त्वाची

विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही (Uddhav Thackerays anger after the results of the Legislative Council) उमेदवार काठावर पास झाले आहे. तसंच शिवसनेनेचे 3 आमदार आणि 9 समर्थक अपक्ष आमदारही फुटले आहेत.

मुंबई 21 जून : विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) आघाडी सरकारला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. आधी राज्यसभेच्या आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election Result) आघाडी सरकार तोंडघशी पडलं आणि भाजपला मोठा विजय मिळवून दिला. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही (Uddhav Thackerays anger after the results of the Legislative Council) उमेदवार काठावर पास झाले आहे. तसंच शिवसनेनेचे 3 आमदार आणि 9 समर्थक अपक्ष आमदारही फुटले आहेत. MLC Election Result : विधान परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा संताप; शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीने वर्षावर बैठक या निकालाचे तीव्र पडसाद काल मध्यरात्रीपासूनच शिवसेनेच्या वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तात्काळ बैठक बोलवली आहे. मात्र त्या आधीच सोमवारी रात्रभर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र एका पाठोपाठ सुरू होतं. MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत 'चमत्कार' घडवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं पहिलं मोठं विधान शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांसोबत बैठका पार पडल्याचं समोर येत आहे. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेला त्यांच्या आमदारांचीही काही मतं मिळाली नाहीत, त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत सर्वकाही ठीक नाही, हे दिसून आलं आहे. याचे मोठे राजिकीय परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Election, Uddhav tahckeray

पुढील बातम्या