जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / MLC Election Result : विधान परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा संताप; शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीने वर्षावर बैठक

MLC Election Result : विधान परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा संताप; शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीने वर्षावर बैठक

MLC Election Result : विधान परिषदेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा संताप; शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीने वर्षावर बैठक

विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) आघाडी सरकारला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election) आघाडी सरकारला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. आधी राज्यसभेच्या आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीत (MLC Election Result) आघाडी सरकार तोंडघशी पडलं आणि भाजपला मोठा विजय मिळवून दिला. विधान परीषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही (Uddhav Thackerays anger after the results of the Legislative Council) उमेदवार काठावर पास झाले आहे. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण १२ मतं फुटल्याचं स्पष्टं झालं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पक्ष प्रमुखांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत वर्षा निवास्थानी दुपारी 12 वाजता तत्काळ बैठकीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) निकाल म्हणजे  महाविकास आघाडी (MLC Election Result) सरकारसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून विजयाची हमी दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात आघाडी सरकारला त्यांचं सरकार असूनही आपली मतं टिकवून ठेवता आलेली नाही, असंच काहीचं चित्र आहे. आघाडी सरकारची एक वा दोन नाही तर तब्बल 21 मतं फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्याच आमदारांची डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी आघाडी सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याचं दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात