मुंबई, 20 जून : राज्यसभेनंतर विधान परिषद (MLC Election Result) निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आपल्या रणनीतीनुसार त्यांनी मताचं समीकरण जुळवून आणलं आणि तब्बल 134 मतांनी भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा आघाडी सरकारमधील असंतोष दाखवून देत आहे. भाजपने म्हटल्याप्रमाणे पाच ही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे असंही ते यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..
- राज्यसभेत 123 आणि आता विधान परिषदेत त्याहून अधिक 134 मतांनी विजयी.
- आघाडी सरकारमध्ये असंतोष आहे. हा असंतोष असाच वाढत राहिला तर काय होईल हे आजच्या निकालाने दाखवलं आहे.
- ज्या अपक्षांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार..
- मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही मतदानासाठी आले त्यामुळे त्यांचं खूप कौतुक आणि आभार.
- आमचा हा संघर्ष सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.
- लोकाभिमूख सरकार आणल्यानंतर आमचा संघर्ष थांबले
काय म्हणाले प्रवीण दरेकर - आनंदी आहोत जनतेच्या मनात सरकारविषयी असंतोष आमदारांच्या माध्यमातून समोर आलं. मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांचे आभार. अकेला देवेंद्र क्या करेगा याचं उत्तर पुन्हा दिलं. सगळ्या पक्षांनी नाराजी, संताप व्यक्त केला आहे. विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. नाना पटोले स्वतः सांगतात आमच्यात एकी नाही मग जनतेसाठी सरकार कसं चालवणार. देवेंद्रजींनी आघाडीला चव्हाट्यावर आणलं