मराठी बातम्या /बातम्या /मनी /Mutual Fund की Shares? कोणती गुंतवणूक फायद्याची आणि कुठे जोखीम जास्त; वाचा सविस्तर

Mutual Fund की Shares? कोणती गुंतवणूक फायद्याची आणि कुठे जोखीम जास्त; वाचा सविस्तर

सर्वसामान्य गुंतवणूकदार थेट शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाला प्राधान्य देतो. यामागे काय नेमकी कारणं आहेत, म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊया.

सर्वसामान्य गुंतवणूकदार थेट शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाला प्राधान्य देतो. यामागे काय नेमकी कारणं आहेत, म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊया.

सर्वसामान्य गुंतवणूकदार थेट शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाला प्राधान्य देतो. यामागे काय नेमकी कारणं आहेत, म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊया.

मुंबई, 26 नोव्हेंबर: भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या दृष्टीने लोक विविध पर्याय अवलंबतात. सर्वसामान्य व्यक्ती शक्यतो जोखीमरहित आणि चांगला परतावा (High Returns in investment) देणाऱ्या पर्यायाला प्राधान्य देतात. त्यामुळे पोस्ट खात्यातील विविध बचत योजना (Post office Schemes), बँकेतील मुदत ठेवी (Bank FD), एलआयसी पॉलिसीज (LIC) अशा पर्यायांनाच अधिक पसंती दिली जाते. त्यात आता म्युच्युअल फंडाची (Mutual Fund investment) भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात लोक आता म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे सर्वांत मोठे कारण असते ते म्हणजे त्यातून मिळणारा उत्तम परतावा आणि त्यामानाने कमी जोखीम. खरं तर  म्युच्युअल फंडातही गुंतवणूकदारांचे पैसे शेअर्समध्येच (Shares) गुंतवले जातात. तरीही सर्वसामान्य गुंतवणूकदार थेट शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाला प्राधान्य देतो. यामागे काय नेमकी कारणं आहेत, म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊया.

आपल्या देशात शेअर बाजारात (Share Market) थेट गुंतवणूक करणाऱ्या लोकांचं प्रमाण अत्यल्प आहे. कारण शेअर बाजार म्हणजे सट्टाबाजार असं मानलं जातं. इथं गुंतवणूक करणं म्हणजे जुगार खेळल्यासारखं असतं, कधी लाखाचे बारा हजार होतील, याची शाश्वती नसते, असा समज पूर्वापार सर्वसामान्य जनतेत रूढ आहे. त्यामुळे सर्वसामान्य वर्ग शेअर बाजाराकडे चुकूनही वळत नाही. अलीकडच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणं अधिक सहज आणि सुरक्षितही झाले आहे, त्यामुळे आता ही स्थिती बदलली आहे. तरीही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अल्पच आहे.

हे वाचा-Stock Market Crash: या प्रमुख कारणांमुळे शेअर बाजार गडगडला,कोरोनाचा असाही परिणाम

शेअर बाजारात अगदी अल्पावधीत मिळणाऱ्या प्रचंड नफ्याचं आकर्षण लोकांना असतं मात्र त्यात जोखीमही अधिक असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याकडे पाठ फिरवतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला स्वतःच शेअर्स निवडावे लागतात. शेअर बाजारात अनेक कंपन्या असतात. त्यातून लाभदायी शेअर निवडणे हे मोठे कठीण काम असते. त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असते. तेवढा वेळ, ज्ञान प्रत्येकाकडे असेल असे नाही. अलीकडच्या काळात शेअरमधील गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणारे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शेवटी परिणामांची जबाबदारी ही गुंतवणूकदाराचीच असते. त्यामुळे शेअर्सची निवड चुकली आणि तो शेअर कोसळला तर क्षणार्धात सगळी गुंतवणूक कवडीमोल होते. शेअर्स निवडणे आणि त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून योग्य वेळी त्याची विक्री करणे ही जबाबदारी सर्वस्वी गुंतवणूकदाराची असते. त्यामुळे त्याच्या एका चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका त्याचे मोठे आर्थिक नुकसान घडवू शकते. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धोका असतो.

हे वाचा-कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं

म्युच्युअल फंड्समध्ये ही सगळी जोखीम फंड कंपन्या घेतात. म्युच्युअल फंड कंपन्या ज्या वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुतंवणूक करतात त्या सर्व शेअर्सची  निवड ही तज्ज्ञ फंड मॅनेजर्सकडून (Expert Fund Managers) केली जाते. गुंतवणूकीवर जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, गुंतवणूकदारांचे नुकसान न होता त्यांना फायदा मिळवून देणे हेच त्यांचे ध्येय असते. त्यामुळं ते एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करता अनेक कंपन्याच्या शेअरमध्ये करतात. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये नुकसान झाले तरी इतर कंपन्यांच्या नफ्यामुळे हे नुकसान भरून निघतं. त्यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये तोट्याचं प्रमाण कमी असतं. तसेच इथे गुंतवणूकदाराला शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याची गरज नसते. त्याला फक्त  फंडाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याची गरज असते.

तसेच शेअर्समध्ये एकदा गुंतवलेली रक्कम अंशत: किंवा अधेमधे काढण्याचा पर्याय नसतो. तसेच शेअर्समध्ये शेअरची किंमत वाढल्यामुळे होणाऱ्या फायद्याव्यतिरीक्त अन्य कोणताही फायदा मिळत नाही.  म्युच्युअल फंड्समध्ये मात्र रक्कम अंशतः काढण्याची, मुदतपूर्व काढण्याची सुविधा (Flexibility) असते. तसेच म्युच्युअल फंड्समध्ये लाभांश मिळण्याचा किंवा तोही गुंतवून अधिक फायदा घेण्याचा ग्रोथचा पर्याय असतो. त्या शिवाय एका फंडामधून दुसऱ्या फंडात पैसे हस्तांतरित करणं, दरमहा थोडेथोडे पैसे भरण्याची सुविधाही असते. या सगळ्या सुविधा शेअरमध्ये मिळत नाहीत.

म्युच्युअल फंड्समध्ये दरमहा ठराविक रक्कम भरण्याच्या एसआयपीच्या पर्यायामुळे कमी रक्कम गुंतवून बाजारातील अस्थिरतेला तोंड देता येते. नफा-तोटा याचे संतुलन साधले जाते. तसे शेअर्समध्ये होत नाही. तिथे दरमहा थोडी रक्कम भरण्याचा पर्याय नसतो. तसंच नफा झाला तर फायदा मिळतो पण तोटा झाला तर नुकसान सोसावे लागते.

हे वाचा-₹1.85 चा शेअर पोहोचला 97 रुपयांवर! 1 लाखाचे झाले 52 लाख, 5150% चा बंपर रिटर्न

शेअर्समध्ये तुम्ही एक वर्षाच्या आत नफा झाला म्हणून ते शेअर्स विकले तर झालेल्या नफ्यावर 15 टक्के  शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) भरावा लागतो. हा कर वाचवायचा असेल तर एका वर्षापेक्षा जास्त काळ त्या शेअर्समध्ये गुंतवणूक ठेवावी लागते. तेच म्युच्युअल फंड्सनी गुंतवणूक केलेल्या शेअर्सवर कोणताही कर लागत नाही, त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. एक वर्षापेक्षा जास्त काळ शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि त्यावर एक लाखापेक्षा अधिक नफा झाला असेल तर दीर्घकालीन भांडवली लाभावर (LTCG) 10 टक्के कर भरावा लागतो.

शेअर्समध्ये फायदा अगदी अल्पावधीत मिळू शकतो, तर म्युच्युअल फंड्समध्ये किमान तीन वर्षे गुंतवणूक ठेवावी लागते. शेअर्समध्ये दीर्घकाळात सरासरी 14 ते 18 टक्के नफा मिळू शकतो, म्युच्युअल फंड्मध्ये हे प्रमाण 8 टक्के असू शकते. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे त्या क्षेत्राची माहिती असलेल्या व्यक्तीसाठी सोपे असते. म्युच्युअल फंड्समध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.

जोखीम आणि फायदा या दोन महत्त्वाच्या बाबीत शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारताना आपल्याला योग्य काय आहे त्याची जाणीव ठेवून निवड करणे महत्त्वाचे आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market